मल्हार प्रॉडक्शन प्रस्तुत निर्माते संतोष शिदम यांनी सादर केलेल्या ‘घोळात घोळ’ या नाटकाचा शतक महोत्सवी प्रयोग ३ ऑगस्ट रोजी शिवाजी मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. बबन प्रभू लिखित हे नाटक काही वर्षांपूर्वी रंगभूमीवर सादर झाले होते. आता सध्या पुन्हा नव्या संचात नाटकाचे प्रयोग होत असून नाटकाचे दिग्दर्शन विजय केंकरे यांनी केले आहे.
दुपारी साडेतीन वाजता होणारा हा शतक महोत्सवी प्रयोग डॉ. विकास आमटे आणि डॉ. साधना आमटे यांच्या ‘आनंदवन’ संस्थेसाठी केला जाणार आहे. या प्रयोगातून मिळणारे उत्पन्न आणि कलाकारांचे मानधन एकत्र करून ती रक्कम ‘आनंदवन’ संस्थेस देणगी म्हणून दिली जाणार आहे. शतक महोत्सवी समारंभास डॉ. विकास आमटे, डॉ. साधना आमटे, राज ठाकरे, महेश मांजरेकर, विक्रम गोखले हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. नाटकात संजय नार्वेकर, हेमंत ढोमे, विजय पटवर्धन, रसिका आगाशे, नेहा कुलकर्णी, आकांक्षा मेहेंदळे, किरण पाटील हे कलाकार आहेत.

Rashmi Thackeray in Thane for Chaitra Navratri festival
ठाण्यात चैत्र नवरात्रौत्सवासाठी रश्मी ठाकरे उपस्थिती… ठाकरे गटाचे शक्तीप्रदर्शन
Babasaheb Ambedkar published Mooknayak lyrics by Vamandada Kardak in the voice of Hariharan
एका वर्तमानपत्राचे गाणे होताना…! ‘मूकनायक’ या वामनदादा कर्डकांचे गीत हरिहरन यांच्या आवाजात; आज प्रसारण
Nita ambani in paithani
Video: पैठणी, चंद्रकोर अन् मराठमोळा साज! NMACC च्या वर्षपूर्ती कार्यक्रमात नीता अंबानी मराठीत म्हणाल्या…
first case registered for violation of code of conduct in mira road
मिरा रोड येथे आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी पहिला गुन्हा दाखल