विद्यार्थी संसदेच्या माध्यमातून चांगल्या नेतृत्वाची संधी मिळते. गुणवत्तेच्या आधारे विद्यार्थी संसदेत प्रतिनिधींची निवड होत असल्याने विद्यार्थी संसदेत चांगले विद्यार्थी येत आहेत. खिलाडू वृत्ती ठेवून विद्यार्थ्यांनी आपली वैचारिक पातळी वाढवून आपला सर्वागीण विकास साधावा. ‘मिलिंद’ मधून बाहेर पडलेला सृजनशील विद्यार्थी भविष्यात देशाचे नेतृत्वही करू शकेल, असा आशावाद प्राचार्या डॉ. वैशाली प्रधान यांनी व्यक्त केला. मिलिंद कला महाविद्यालयात विद्यार्थी संसदेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. प्रधान बोलत होत्या.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. वाल्मीक सरवदे उपस्थित होते. जिद्द व चिकाटी ठेवून आत्मविश्वासाने अभ्यास करा. आई-वडिलांचा व गुरुजनांचा आदर करा, तुमचे ध्येय निश्चित पूर्ण होईल. विद्यार्थ्यांनी अंगी शिस्त व सहकार्याची भावना ठेवावी. कलागुणांना वाव द्यावा, असे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन डॉ. विनिता खापर्डे यांनी केले.