मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
- घाऊक बदल्यांच्या बडग्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमध्ये असंतोष
- एलबीटीचा भरणा सुरू; व्यापाऱ्यांमध्ये फूट
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- व्यापाऱ्यांना एलबीटी भरावाच लागेल - मुख्यमंत्री
- 'गोकुळ'च्या कारभाराची 'सीआयडी'करवी चौकशी करा (शेतकरी कामगारपक्षाची मागणी)
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
एड्ससारख्या दुर्धर आजाराचे रुग्ण आफ्रिका खंडात सर्वाधिक आहेत. या आजारावर मोठय़ा प्रमाणावर संशोधन सुरू असले तरी काही स्वस्तात उपलब्ध होऊ शकणारी 'अॅण्टीरेट्रोव्हायरल' औषधे पाश्चात्य देशांतील बलाढय़ औषध कंपन्यांनी तयार केली आहेत. परंतु, ही औषधे या कंपन्या आणि पाश्चात्य देशांची सरकारे यांनी १९९० आणि २००० च्या दशकामध्ये आफ्रिकेसह अनेक देशांमधील रुग्णांपर्यंत पोहोचू नयेत यासाठी प्रयत्न केले. परिणामी या दुर्धर आजाराच्या लाखो रुग्णांना औषधाविना प्राण गमवावे लागले. याच विषयावर मुंबईस्थित भारतीय-कॅनेडियन वंशाचे दिग्दर्शक डिलन मोहन ग्रे यांनी माहितीपट बनविला आहे. 'फायर इन द ब्लड' असे या माहितीपटाचे नाव असून अमेरिकेतील उटाह राज्यात सुरू झालेल्या प्रतिष्ठेच्या 'सनडान्स' आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील माहितीपटांच्या विभागात तो दाखविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे तब्बल १२ हजार माहितीपटांच्या प्रवेशिकांमधून 'फायर इन द ब्लड'चे नामांकन 'ग्रॅण्ड ज्युरी' पुरस्कारासाठी करण्यात आले आहे.
डिलन मोहन ग्रे यांचा जागतिक स्तरावरचा हा माहितीपट चार खंडांमध्ये करण्यात आला आहे. भारतात ५ एप्रिल रोजी हा माहितीपट प्रदर्शित होत आहे.
जगभरातील 'इंडिपेंडण्ट सिनेमा' या गटातील निर्माते-दिग्दर्शकांचे चित्रपट-माहितीपट सनडान्स महोत्सवात प्राधान्याने निवडले जातात. भारतासह आफ्रिकेमध्ये एड्स आजाराबाबतची सार्वजनिक धोरणे, लोकांची याबाबतची भूमिका यांसारख्या गोष्टींवरही या माहितीपटांतून प्रकाशझोत टाकण्यात आला असून बिल क्लिंटन, डेसमण्ड टूटू आदी मान्यवरांनी या माहितीपटासाठी मदत केली आहे.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा


















