भीमशक्ती सामाजिक संघटना आणि समाज प्रबोधन संस्था यांच्या वतीने येथील हार्मनी कलादालनात ‘आपत्ती व्यवस्थापन’ या विषयावरील पी. गिरीश यांच्या व्यंगचित्र प्रदर्शनास नाशिककरांनी उत्तम प्रतिसाद दिला.
प्रदर्शनाचे उद्घाटन माजी महापौर अशोक दिवे, प्राचार्य बाळ नगरकर, गं. पा. माने, प्राचार्य डी. के. पाटील, प्राचार्य एन. एच. रौंदळ यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून श्रीकांत सोनवणे, रमेश शिंदे, डॉ. शामकुमार दुसाने उपस्थित होते. सूत्रसंचालन अविनाश आहेर व विवेक देशपांडे यांनी केले. मान्यवरांचा सत्कार हार्मनीचे संचालक राजा पाटेकर व मोहन जगताप यांनी केले. आभार विजयकुमार परिहार यांनी मानले.
गिरीश यांनी व्यंगचित्रांच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन या विषयावर प्रबोधनपर संदेश दिलेला असल्याने ज्या शाळा, महाविद्यालयांना या व्यंगचित्रांचे प्रदर्शन आयोजित करावयाचे असेल त्यांनी अविनाश आहेर ९८२२८२०५६४ किंवा विवेक देशपांडे ९८९०५२५९२५ यांच्याशी संपर्क साधावा  असे आवाहन करण्यात आले आहे.