मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
- ओबीसी समाज धर्मातराच्या वाटेवर
- श्रीनिवासन आगे बढो..
- 'फादर्स डे' विशेष : एक अटळ हळवा प्रवास
- ययाति आणि देवयानी
- 'नमो'नियाची बाधा
मोस्ट रीड
नौदलाने सुरक्षेच्या कारणासाठी बंद केलेले ग्रीन गेट सध्या मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरून पर्यटनासाठी येणाऱ्या विदेशी पर्यटकांना अडचणीचे ठरत आहे. मुंबई बंदरात आंतरराष्ट्रीय क्रूझने येणाऱ्या पर्यटकांना आपल्या सामानासह मुंबई शहरात येण्यासाठी सक्तीने काही अंतर चालत जावे लागत आहे. त्यामुळे मुंबई बंदरात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रूझच्या संख्येवर मर्यादा आली आहे. परिणामी आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलसाठी वेगळे ठिकाण निवडण्याची तयारी सुरू झाली आहे.
आंतरराष्ट्रीय क्रूझने मुंबई आणि भारतामध्ये वर्षांला ४० हजारहून अधिक विदेशी पर्यटक येत असून आंतरराष्ट्रीय दर्जाचे टर्मिनल झाल्यास पर्यटकांच्या संख्येमध्ये आणखी भर पडू शकते. सध्या वर्षांचे केवळ ४० दिवस क्रूझ टर्मिनलचा वापर होत असून अन्य दिवस हे टर्मिनल बंद असते. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी मुंबई बंदरामध्ये विदेशी र्पयटकांसाठी आधुनिक सुविधा असलेले आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल उभारण्याची घोषणा केली होती. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने मुंबई पोर्ट ट्रस्टच्या सध्याच्या जागेची पाहणी करून तेथील एक लाख चौरस फूट जागेचा विकास करण्याची तयारी दर्शविली आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टने सध्या असलेल्या टर्मिनलवर वातानुकूलित हॉल, गँगवे, माहिती केंद्र, डय़ुटी फ्री शॉप, स्वतंत्र सामान कक्ष, सीसीटीव्ही आदीची सोय केली आहे. आणखीही सुविधा करून देण्याची तयारी मुंबई पोर्ट ट्रस्टने दाखवली असली तरी जवळच असलेल्या नौदलाचे प्रतिबंधक क्षेत्र जवळच असल्याने अधिक विकास करणे शक्य नसल्याचे ट्रस्टकडून सांगण्यात आले. यामुळे पर्यटकांना बाहेर जाण्यासाठी किमान एक ते दीड किमी अंतर चालत जावे लागते.
सामानासह इतके अंतर चालत जाण्याच्या त्रासामुळे क्रूझने येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढण्यावर मर्यादा येत असल्याचे पर्यटन विकास महामंडळाचे म्हणणे आहे. बंदरात उतरल्यावर तेथून बाहेर जाण्यासाठी जवळच असणारे ग्रीन गेट हे नौदलाच्या अखत्यारीत असून सुरक्षेच्या कारणास्तव ते बंद ठेवण्यात आले आहे. नौदलाने गुप्तचर यंत्रणांबरोबर केलेल्या सुरक्षा पाहणीमध्ये ग्रीन गेट हे बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे पर्यटन विकास महामंडळ, मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि नौदलाच्या अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत महामंडळाची ही मागणी फेटाळण्यात आली. त्यामुळे आता टर्मिनलसाठी नव्या जागेचा शोध घेणे सुरू झाले आहे .
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















