शहरातील हौसला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने पहाटे पांडवलेणी डोंगरावरील सर्वाधिक उंच टोकावर तिरंगा फडकवून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला संस्थेच्र्या कार्यकर्त्यांसह अनेक युवा व बालमंडळी उपस्थित होती. सकाळी सर्व पांडवलेणीच्या पायथ्याशी जमल्यावर त्यांनी परिसरातील सर्व कचरा, प्लास्टिक पिशव्या, कागद, काचेच्या बाटल्या आदी सुमारे ३० गोण्या भरून जमा केल्या. त्यानंतर सर्वानी पांडवलेणीच्या वरच्या टोकाला जावून ध्वजवंदनाचा कार्यक्रम केला. हौसला संस्थेच्या तेजस चव्हाण, आशीष लकारिया, अक्षय धोंगडे, अनिकेत झवर, यश निकम आदींसह इतर कार्यकर्त्यांनी यापुढेही प्रत्येक स्वातंत्र्य दिनी आणि प्रजासत्ताक दिनी अशाच कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

dhule crime news, dhule gutkha transport marathi news,
साड्यांच्या गठ्ठ्यांआडून गुटख्याची वाहतूक, धुळे जिल्ह्यात साडेदहा लाखाचा मुद्देमाल जप्त
The Central Wildlife Board proposed a highway through the largest tiger project in the country
देशातील सर्वात मोठय़ा व्याघ्रप्रकल्पातून महामार्ग जाणार
dombivli marathi news, pedestrian bridge on railway line
डोंबिवलीतील गणपती मंदिराजवळील रेल्वे मार्गावरील पादचारी पूल धोकादायक; १ एप्रिलपासून डोंबिवली पूर्व-पश्चिमेकडे जाण्याचा मार्ग बंद
holi 2024 people celebrate holi with enthusiasm
Holi 2024 : देशामध्ये होळीचा रंगीत हर्षोल्हास