देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शहरातील तरुणाई अमली पदार्थाच्या विळख्यात सापडली असून पोलिसांची वेळोवेळी कारवाई होत असली तरी हे अमली पदार्थ नशेखोरांना सहज उपलब्ध होत आहेत.  
वाहतुकीची साधने उपलब्ध असल्याने अमली पदार्थही सहजच उपलब्ध होऊ लागले आहेत. महाविद्यालय परिसरात विशेषत: अभियांत्रिकीसारख्या महाविद्यालयांजवळ अमली पदार्थ उपलब्ध होत असले तरी उघडपणे विकले जात नाहीत. विकत घेणारा विकणाऱ्यांच्या सहज लक्षात येतो. मोमीनपुरा, हसनबाग, ताजबाग, सदर, मानकापूर, धरमपेठ, एमआयडीसी, बजेरिया, रेल्वे स्थानक परिसरात ग्राहकी मोठी असल्याने विक्रीही मोठय़ा प्रमाणात होत असल्याची पोलिसांची माहिती आहे.
पाकिस्तान, नायजेरिया, नेपाळ आदी देशांमध्ये गर्द तयार होते. विशाखापट्टनम, आदिलाबाद, उदिशातील संबलपूर, अंगुल, ढेकनाल, बलंगीर या भागात गांजा व चरसचे तर मराठवाडा तसेच नागपूर जिल्ह्य़ातही चोरून अफूचे उत्पादन घेतले जाते. रेल्वे व रस्ते मार्गाने ट्रक, बस वा इतर वाहनांमध्ये इतर मालांच्या आड दडवून अमली पदार्थ आणले जातात. शहरात अमली पदार्थामध्ये सर्वाधिक प्रमाणात गांजा व गर्द (हेरॉईन किंवा ब्राऊन शुगर) विकले जाते. चरस वापरणाऱ्यांचे प्रमाण अत्यंत कमी आहे. विशिष्ट रॅकेट नसले तरी अनेक छोटे-मोठे विक्रेते मात्र असल्याची माहिती सूत्रांनी दिली. लहान-मोठे गुन्हे करून मिळालेल्या पैशातून अमली पदार्थ विकत घ्यायचे. अशा प्रकारे तरुणाई वाममार्गाला लागली असल्याची गंभीर बाब पोलीसही मान्य करतात.
ब्रेडला आयोडेक्स लावून खाण्याची पद्धत आता जुनी झाली आहे. खोकल्याचे औषध अधिक प्रमाणात घेतले जाते. मॅन्ड्रेक्सच्या गोळ्या खाल्ल्या जातात. पादत्राणे चिटकविण्यासाठी वापरला जाणारा घट्ट द्रव पदार्थ, थीनर, व्हाईटनर आदींचा नशेसाठी वापर केला जात आहे. साखरेची भुकटी चांदीसारखा वर्ख असलेल्या कागदावर ठेवून त्याखालून आगपेटीच्या काडीने जाळायचा व त्याचा वास घ्यायचा. कमी बजेट असणाऱ्यांनी ही नवी शक्कल शोधली आहे.  शहरात दहा वर्षांपूर्वी महालमधील दाट लोकवस्तीततील एका घरात छापा मारून पोलिसांनी गर्दचा मोठा साठा जप्त केला होता. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात ३१७ ग्रॅम गर्द तर मागील वर्षी अडीच किलो चरस जप्त करण्यात आले. नागपुरात २०१३मध्ये १९ किलो ६८८ ग्रॅम अमली पदार्थ जप्त करण्यात आले. अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी ४६ तर सेवन केल्याप्रकरणी ३ गुन्हे दाखल करण्यात आले. २०१४ मध्ये १७९ किलो गांजासह एकूण १८० किलो १६० ग्रॅम अमली पदार्थ जप्त करण्यात आले. अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी ५२ गुन्हे दाखल करून ७५ आरोपींना अटक करण्यात आली. अमली पदार्थ सेवन केल्याप्रकरणी ४८ गुन्हे दाखल करून ८ आरोपींना अटक करण्यात आली.
अमली पदाथार्ंचे व्यसन म्हणजे विकत घेतलेला आजार असल्याचे मत हिंगणा औद्योगिक परिसरातील मैत्री व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्राचे संचालक रवि पाध्ये यांनी व्यक्त केले. आज आनंदाची व्याख्याच बदलली आहे. नोकरीनिमित्त सतत घराबाहेर राहणाऱ्या आई-वडिलांचे दुर्लक्ष तसेच वसतिगृहात राहणारी मुले व्यसनाधीन झाली आहेत. मुलांना आई- वडिलांबद्दल प्रेम राहिलेले नाहीत. मनासारखे झाले नाही, इगो आणि पालकांचे न ऐकणे, हेकेखोरपणा, यातून तरुण विशेषत: १४-१६ वर्षांचे मुलं-मुली व्यसनाधीन होऊ लागले आहेत. मोठय़ा प्रमाणात तरुणाई व्यसनाधीन होत असल्याने गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. सकाळी व्यायाम, योगोपचार, प्राणायाम, गट चर्चा, व्याख्याने, खेळ, प्रार्थना हे व्यसनमुक्तीचे मार्ग आहेत. तरीही इच्छाशक्ती आणि प्रामाणिकपणा असेल तर व्यसनाच्या गर्तेतून नक्कीच बाहेर पडता येते, असे पाध्ये यांनी सांगितले.

दरवर्षी रेल्वे व नागपूर परिक्षेत्रातील जप्त अंमली पदार्थाचा साठा न्यायालयाच्या आदेशानुसार जाळून टाकला जातो. २०१२ मध्ये नागपूर परिक्षेत्रातील जप्त एकूण ५०० किलो २१० मिलीग्रॅम गांजा, २०१ ग्रॅम १०६ मिलीग्रॅम ब्राऊन शुगर, ११ ग्रॅम चरस, ५ ग्रॅम  भांग, ४८ किलो ६३१ ग्रॅम डोडा पावडर तसेच २०१३ मध्ये नागपूर परिक्षेत्रातील जप्त १३६ ग्रॅम गांजा, ९६ ग्रॅम गर्द, १७ ग्रॅम चरस व इतर साहित्य, असा एकूण ४८६ किलो साठा तसेच २०१४ मध्ये नागपूर परिक्षेत्रात जप्त ४९९.७९७ किलोग्रॅम गांजा, २.२८७ किलोग्रॅम अफिम, २६.३५३ ग्रॅम हेरॉईन, ३५२ ग्रॅम चरस तसेच गडचिरोली परिक्षेत्रात जप्त ४९.९९६ किलोग्रॅम गांजा व १९१.५०३ ग्रॅम अफिम, असा एकूण ५४९.९७७ किलोग्रॅम गांजा व इतर अंमली पदार्थाचा साठा जाळून नष्ट करण्यात आला.  

PMC pune municipal corporation
रस्त्यावर फेकलेल्या कचऱ्यातून पत्ते शोधून दंडाची वसुली; मोटारीतून कचरा फेकणाऱ्यांचा पाठलाग करून महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कारवाई
Development Plan, Navi Mumbai, Wetlands, Residential Complexes, Political Silence, flamingo, environment,
नवी मुंबई : पाणथळीच्या जागा निवासी संकुलांसाठी खुल्या करण्याचा निर्णय, पर्यावरणप्रेमींचा विरोध, नेत्यांचे सोईस्कर मौन
mhaisal yojana marathi news, mhaisal project sangli marathi news, mhaisal sangli jat taluka water issue marathi news
जतमध्ये पाण्यावरून राजकीय श्रेयवाद उफाळून आला
parental anxiety parents concern about drug addict children
अधोविश्व : अमली पदार्थांमुळे पालकांमध्ये चिंता