मनसेच्या नगरसेविका प्रियांका शृंगारे यांचे नगरसेवकपद अवैध ठरविण्यात आल्याने त्या २०१४-१५ या वर्षांत पालिका सभागृहात उपस्थित नव्हत्या. ‘मुंबई वृत्तान्त’च्या १० जुलैच्या पुरवणीमध्ये ‘नगरसेवकही दांडीबहाद्दर!’ या वृत्तात शृंगारे यांच्या नावाचा चुकून उल्लेख झाला आहे. दक्षता समितीच्या अहवालावरून प्रकरण न्यायप्रविष्ट झालेले असताना आपले नगरसेवकपद २७ मार्च २०१४ रोजी संपुष्टात आणण्यात आले होते. मात्र उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर १० फेब्रुवारी २०१५ रोजी त्यांचे नगरसेवकपद अबाधित राखण्यात आले, मार्च २०१४ ते फेब्रुवारी २०१५ दरम्यान आपण नगरसेविका नव्हतो. त्यामुळे आपण दांडीबहाद्दर नगरसेविका होऊ शकत नाही, असा खुलासा मनसेच्या नगरसेविका प्रियांका शृंगारे यांनी केला आहे.