नियोजन विभागाच्या आदेशानुसार यशदा व अर्थ तथा सांख्यिकी संचालनालयाच्या वतीने २०१६ साली तयार होणाऱ्या मानव विकास अहवाल तयार करण्यासाठी नाशिक जिल्ह्यात सव्‍‌र्हेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. जुलै २०१५ पर्यंत हे काम सुरू राहणार असून संबंधितांनी सहकार्य करावे असे आवाहन डॉ. मीनल नरवणे यांनी केले आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून या सव्‍‌र्हेक्षणाचे काम होणार आहे. जिल्ह्यात मासिक दरडोई उपभोगिता खर्चाचे सर्वेक्षण या माध्यमातून होणार आहे. या माहितीचा उपयोग राज्याच्या नियोजनाकरीता व धोरणे ठरविण्याकरीता तसेच योजना आखण्यासाठी करण्यात येतो. सव्‍‌र्हेक्षण कार्यात यशदाच्यावतीने कांचन मंडलिक, अमोल कापडनीस, उत्तम पवार तसेच नाशिक जिल्हा समन्वयक म्हणून सचिन पगार काम पाहत आहेत.