मुलाखतीला जाताना आपल्याला न मागता अनेक सल्ले मिळत असतात. पण या सल्ल्यांमुळे अनेकदा आपण गोंधळून जातो आणि हातात असलेली नोकरी गमावून बसतो. तर कंपनीला अनेकदा गुणवत्ता असलेले उमेदवार मुलाखतीमधील नकारात्मक निरीक्षणांमुळे नाकारावे लगातात. मुलाखतीला जाताना कशी तयारी करा याबाबत अनेक संकेतस्थळे आणि अॅतप्स उपलब्ध आहेत. मात्र या सर्वापेक्षा काहीसे वेगळे असे अॅतप ‘टाटा कन्सल्टंसी सव्‍‌र्हिसेस’ (टीसीएस)ने विकसित केले आहे.
इंटरव्ह्य़ू रेडी असे या अॅकपचे नाव असून या ‘बिझनेस प्रोसेस सव्‍‌र्हिसेस’मध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी हे अॅटप उपयुक्त ठरणार आहे. या अॅ पमध्ये ‘बीपीएस इंडस्ट्री’, ‘इंग्लिश लेसन’, ‘इंटरव्ह्य़ू क्वेश्चन्स’, ‘लिव्ह अ मार्क’ आणि ‘बिल्ड युवर रेझ्युमे’ असे विभाग आहेत. यातील पहिल्या भागात बीपीएस क्षेत्रात येणाऱ्या विविध संज्ञांची माहिती दिली आहे. या संज्ञा जर आपण मुलाखतीला जाण्यापूर्वी वापरल्या तर त्यामुळे आपल्याला विचारलेल्या प्रश्नांची तातडीने उत्तरे देता येऊ शकतात. दुसऱ्या विभागात इंग्रजीबाबत काही टिपण्णी देण्यात आल्या आहेत.
मुलाखतीदरम्यान कोणते इंग्रजी शब्द वापरावेत, कोणती वाक्ये असावीत याबाबत यामध्ये मार्गदर्शन करण्यात आले आहे. तर तिसऱ्या भागात मुलाखतीत विचारली जाऊ शकणारी संभाव्य प्रश्नावली आहेत. यासाठी काही नमुन्यादाखल व्हिडीओज देण्यात आले आहेत. चौथ्या विभागात मुलाखतीदरम्यान तुम्ही तुमची छाप कशी सोडू शकता यासाठी काही सूचना करण्यात आल्या आहेत. तर पाचव्या विभागात तुमचा रेझ्युमे कसा बनावायचा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. यात प्रथम नोकरी करण्यासाठी वेगळ्या सूचना आहेत तर अनुभवी व्यक्तींसाठी वेगळ्या सूचना देण्यात आल्या आहेत. देशात दरवर्षी सुमारे ५० लाख विद्यार्थी पदवीधर होतात. मात्र त्यापैकी केवळ ५३ टक्केच लोक नोकरी मिळवू शकतात. उर्वरित ४७ टक्के लोक त्यांच्याकडील कमी असलेल्या कौशल्यांमुळे बेरोजगार राहतात. या उर्वरित मुलांनाही मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कंपनीने हा प्रयत्न केला आहे. हे अॅकप एकदा डाऊनलोड केले की ते वापरण्यासाठी इंटरनेटची जोडणी आवश्यक नसते. सध्या अॅआप अॅसण्ड्रॉइड आणि आयओएसवर उपलब्ध असून ते इंग्रजीसह हिंदी, मराठी, बंगाली, गुजराती, तामिळ, अरेबिक आणि उर्दू या भाषांमध्ये उपलब्ध आहे.

कॉर्पोरेट क्षेत्रात काम करण्यासाठी सर्वाना समान संधी उपलब्ध व्हावी यासाठी हे अॅअप नक्कीच उपयुक्त ठरेल. केवळ भाषेचा अडसर म्हणून उमेदवार मागे राहू नये. पदवीनंतर नोकरीच्या जीवनात प्रवेश करणाऱ्या तरुणांसाठी हे अॅ.प पहिली पायरी ठरू शकेल.
राजन बंडोपाध्याय, ग्लोबल हेड,
एचआर प्रोसेस डेव्हलपमेंट