‘कोई मिल गया’मधला रोहित ते ‘क्रिश थ्री’ मधला पहिला भारतीय सुपरहिरो क्रिश असा तीन टप्प्यांतला प्रवास असलेला चित्रपट, क्रिश थ्रीसाठी दिग्दर्शक-निर्माते राकेश रोशन यांनी गोष्टीला दिलेले प्राधान्य, कंगना राणावत, विवेक ओबेरॉय यांच्या महत्त्वाच्या भूमिका आणि ‘डान्सिंग सुपरहिरो’ हृतिक रोशन यांनी चित्रपटाविषयी ‘स्क्रीन बिग पिक्चर’ कार्यक्रमात केलेल्या दिलखुलास गप्पा. ‘क्रिश थ्री’ हा संपूर्णपणे भारतात बनलेला आणि पहिला भारतीय सुपरहिरो असलेला चित्रपट ठरणार आहे. वास्तविक सुपरहिरो ही संकल्पना कॉमिक बुक्समधून तयार झाली. हॉलीवूडमध्ये अनेक सुपरहिरोंवर चित्रपटांच्या मालिका आल्या, गाजल्याही. परंतु, भारतीय सुपरहिरो ही संकल्पना भारतीय प्रेक्षकांसाठी नवीन आहे. त्यातही टीव्हीवरील कार्टून वाहिन्यांवरील भारतीय सुपरहिरो आता रूजले असले तरी चित्रपटात या सगळ्याला फाटा देऊन राकेश रोशन यांनी ‘क्रिश थ्री’ मध्ये नव्या प्रकारचा भारतीय सुपरहिरो विज्ञान चमत्कृती चित्रपटाद्वारे निर्माण केला आहे.
दिग्दर्शक राकेश रोशन

‘कहो ना प्यार है’नंतर काहीतरी वेगळे करायची इच्छा होती, म्हणून ‘कोई मिल गया’ बनविला. त्यात हृतिकचे अभिनयगुण दिसले. त्यात आम्ही अपंग मुलगा आणि ‘जादू’ दाखवली होती, परंतु लोकांना तो चित्रपट आवडला. त्यानंतर त्याचा सीक्वेल काढायचा विचार करीत होतो. परंतु मनासारखे आपल्या भारतीय पद्धतीचे कथानक तयार होत नव्हते. गोष्ट थोडक्यात तयार झाली तरी पटकथेत त्याचा विस्तार मनासारखा करता येत नव्हता. दरम्यानच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. ‘क्रिश’ची कल्पना ‘लॉर्ड ऑफ दी रिंग्स’ पाहिल्यानंतर सुचली. या चित्रपटाचे तिन्ही भाग पाहिल्यानंतर अशा प्रकारचा चित्रपट आपल्याकडे का बनविला जात नाही, असे वाटले. ‘कोई मिल गया’मध्ये जादू ही संकल्पना वापरली होती. त्यामुळे त्याचाच आधार घेऊन रोहित या व्यक्तिरेखेला ‘क्रिश’ बनविले. जादूमुळे क्रिशला अतिंद्रिय शक्ती मिळाली हे प्रेक्षकांना पटू शकेल हे जाणवले. झाडांच्या वरून उडत जाणे, उलटय़ा दिशेने उडय़ा मारणे, नद्या सहजपणे पार करणे, एवढेच काय आपल्या प्रेयसीला मिळविण्यासाठी सिंगापूरलाही क्रिश गेला. जेव्हा अतिशय कठीण प्रसंग उद्भवेल किंवा एखाद्या माणसाचा जीव वाचविण्यासाठीच आपण आपल्याकडील ‘शक्ती’चा वापर करू, असे वचन क्रिशने आपल्या आजीला दिले आहे. त्यामुळे अशा कठीण प्रसंगीच क्रिश आपले स्पेशल जॅकेट परिधान करतो आणि तोंडावर मास्क लावून सुपरहीरो बनतो. ‘क्रिश थ्री’मधला सुपरहीरो मनात तयार होण्यासाठी खूप कालावधी लागला. सुपरहीरो विरुद्ध सुपरव्हिलन लढाई दाखविणे अपेक्षित असते, परंतु मनासारखी पटकथा तयार व्हावी म्हणून अनेक पटकथा वाचून रद्दबातल ठरविल्या. परंतु अखेर एक दिवशी क्रिश सापडला. कथानक हृतिक तसेच लेखकांना ऐकवले आणि सगळ्यांनाच त्यात रस वाटल्यावर लेखकांनी तीन-चार महिन्यांतच पटकथा-संवाद लिहून काढले. गोष्ट चांगली असावी, पटकथेचा आत्मा भारतीय असावा हे फार महत्त्वाचे आहे.
आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे संपूर्ण अ‍ॅनिमेशन, व्हीएफएक्स हे भारतात आपल्याच तंत्रज्ञांनी केले आहे आणि त्याचा मला सार्थ अभिमान वाटतो. हा ‘मेड इन इंडिया’ चित्रपट आहे.
हृतिक रोशन

Indian Premier League Cricket Mumbai vs Chennai ipl 2024 match sport news
इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट: मुंबई-चेन्नई आमनेसामने! पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांत आज वानखेडेवर होणाऱ्या द्वंद्वात धोनीवर लक्ष
d Gukesh defeated Nijat Abasov in the Candidates chess tournament sport news
गुकेश संयुक्त आघाडीवर! पाचव्या फेरीत अबासोववर मात; अन्य भारतीयांच्या लढती बरोबरीत
Rohit breaks Dhoni's sixes record
IPL 2024 MI vs DC : रोहित शर्माने मोडला धोनीचा विक्रम! वॉर्नर-कोहलीच्या ‘या’ खास क्लबमध्येही झाला सामील
Candidates Chess Tournament R Pragyanand success in defeating Alireza Firooza sport news
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा: प्रज्ञानंदने फिरूझाला रोखले! गुकेश-विदित, हम्पी-वैशालीमध्ये पहिल्या फेरीत बरोबरी

सुपरहिरो चित्रपट हॉलीवूडमध्ये अनेक आहेत. परंतु, आपल्या भारतीय प्रेक्षकांना हवा असलेला सुपरहिरो मी साकारलाय असे वाटते. कारण हा सुपरहिरो नृत्य करणारा आहे. संगीत हा आपल्या भारतीयांचा आत्मा आहे. जन्मापासून ते सर्व प्रकारच्या सोहळ्यांमध्ये संगीत, नृत्य असते. त्यामुळे संगीताशिवाय चित्रपट ही कल्पनाच मला करवत नाही.  त्यामुळे क्रिश थ्रीमध्येही भरपूर नृत्य आहे, अ‍ॅक्शन आहे. अ‍ॅक्शन दृश्ये करताना मला अनेक दुखापतीही झाल्या आहेत. या चित्रपटासाठी मी खूप मेहनत तर घेतली आहेच. परंतु, त्याशिवाय मनापासून अनेक गोष्टी केल्या आहेत. त्यामुळे लोकांना हा चित्रपट आवडेल असे वाटते. कथानक, गोष्ट, पटकथा सुसंगत असणे  हेच मोठे आव्हान होते. ते नीट सापडेपर्यंत चित्रपट सुरूच केला नाही. स्पेशल इफेक्ट्सपेक्षाही कथानकाची सुसंगतरित्या गुंफण करणे हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे, असे बाबांचे म्हणणे होते आणि ते मलासुद्धा पटले. मला खरे तर विवेक ओबेरॉयची खलनायकी भूमिका खूप आवडली होती.  परंतु, वडिलांनी ऐकले नाही.
 कंगना राणावत
काया ही व्यक्तिरेखा मी साकारत असून ही भूमिका नेहमीच्या चित्रपटापेक्षा खूपच वेगळी आहे. काया ही अर्धी मानव आहे अर्धी पशू आहे. माझ्याबरोबरच विवेक ओबेरॉयची भूमिका हीसुद्धा गाजणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर लोक त्याला शाकाल आणि मोगॅम्बो यांसारख्या खलनायकांच्या रांगेत उभे करतील असे मला वाटते. अशा पद्धतीच्या सुपरहिरो चित्रपटात भावनिक प्रसंगांचे चित्रिकरण करताना दिग्दर्शकांनी सांगितलेल्या गोष्टींचा खूप फायदा झाला. अर्धी पशू असलेली काया हिला पशू असताना भावनिक होणे गरजेचे नसते. परंतु, तिला बोलायची गरज पडते तेव्हा ती माणसासारखेच बोलते. श्ॉमिलियॉनचे उदाहरण राकेश रोशन चित्रिकरणादरम्यान नेहमी देत असत. त्याचा उपयोग झाला. माझा ‘लूक’ यावरही या चित्रपटात खूप भर देण्यात आला आहे.
ल्ल  विवेक ओबेरॉय

हा चित्रपट माझ्यासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे, अनोखा अनुभवही ठरला आहे. हृतिक आणि डब्बू अंकल (म्हणजे राकेश रोशन) यांच्यासोबत काम करायला खूप मजा आली. खूप शिकायला मिळाले. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतरच माझा लूक आणि माझी व्यक्तिरेखा लोकांसमोर येणार आहे. तोपर्यंत ती गुलदस्त्यात ठेवली जाणार आहे. जबरदस्त खलनायक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे एवढेच आता सांगता येईल. आतापर्यंत ३०-३५ चित्रपट मी केलेत. परंतु, या चित्रपटाइतके संघटितपणे काम करणे याचा अनुभव प्रथमच आला. या चित्रपटासाठी खूप संशोधनही करण्यात आले हे जाणवले. हैद्राबादमध्ये कडक उन्हाळ्यात सबंध धातूची असलेली २८ किलो वजनाची वेशभूषा परिधान करून चित्रिकरण केले आहे. लोकांना मी साकारलेला खलनायक आवडेल का याचीच आता उत्सुकता लागून राहिली आहे.