मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- टोलप्रकरणी हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी
- सोलापूर विद्यापीठाच्या नामांतरावरून राजकारण रंगू लागले
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- जमिनीच्या वादातून बिल्डरवर गोळीबार; प्रकृती चिंताजनक
- ताडोबाच्या बफरझोनमध्ये वनभ्रमंतीला चालना देण्याची मागणी
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
आता लवकरच मी तुम्हाला अमिताभ यांच्यासह गाणे गाताना दिसेन, आमचे एकत्रित गाणे भविष्यात तुम्हाला ऐकायला मिळेल, अशी ग्वाही दस्तुरखुद्द लता मंगेशकर यांनी दिली तेव्हा उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करीत त्यांना दाद दिली.
एल. एम. म्युझिक कंपनीचा शुभारंभ रविवारी मुंबईतील जे. डब्ल्यू. मेरियट हॉटेलमध्ये झाला, त्या वेळी त्या बोलत होत्या. मिश्कील शेरेबाजीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या लतादीदींच्या या घोषणेमुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये हास्याची लकेर उमटली.
अमिताभ यांच्यासोबतच्या गाण्याची त्यांनी अधिकृत घोषणा केली नाही, मात्र हा योग जुळून आला तर उभयतांच्या चाहत्यांसाठी ती मोठी पर्वणी ठरेल. 'ये कहाँ आ गए हम' या गाण्यात लतादीदींच्या स्वरासह अमिताभ यांचे संवाद आहेत, मात्र ते रूढ अर्थाने युगूल गीत नसल्याने त्यांच्या संभाव्य युगूल गीताविषयी प्रचंड उत्कंठा दिसून आली.
लतादीदींनीच सुरू केलेल्या या नव्या म्युझिक कंपनीचा शुभारंभ ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. जसराज यांच्या हस्ते झाला.
या वेळी नीता अंबानी, अमिताभ बच्चन व्यासपीठावर उपस्थित होते तर हा सोहळा अनुभवण्यासाठी मंगेशकर कुटुंबीय, श्रीदेवी, बोनी कपूर, सुरेश वाडकर, हरिहरन, रवींद्र जैन, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, पंकज उधास आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी या कंपनीच्या 'रंग स्वरांचे, स्वामी समर्थ, तनखोज मन पाया, हर हर महादेव, सचिन मी होणार आणि सिद्धार्थ' या आल्बमचे प्रकाशन करण्यात आले. लतादीदींचा आवाज हे जगातील एक आश्चर्य असून, त्याची स्तुती करण्यासाठी शब्दकोशात शब्द नाही, त्यांचे गाणे ऐकून संगीत शिकता येते, अशा शब्दांत जसराजजींनी लतादीदींचा गौरव केला, तर लतादीदींचे गाणे देशभरातील चार पिढय़ा ऐकत आहेत, असे नीता अंबानी म्हणाल्या. चित्रपट संगीताने मला खूप काही दिले आहे, त्याची परतफेड करण्याची आता वेळ आली आहे, या कंपनीच्या माध्यमातून तरुण पिढीतील गुणी कलाकारांना आम्ही संधी देऊ, असे मनोगत लतादीदींनी व्यक्त केले.
या कंपनीच्या नव्या आल्बमद्वारे मी आणि अमिताभ एकत्र गाणे गाताना दिसू, असे गोड संकेत त्यांनी शेवटी दिले.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















