पक्ष्यांची मराठी भाषेतील नावांसाठी महाराष्ट्रात पक्ष्यांसंबंधीची अनेक चांगली पुस्तके उपलब्ध आहेत, पण त्या प्रत्येक पुस्तकात एकाच पक्ष्याची वेगवेगळी नावे अंतर्भूत आहेत. अनेक जिल्ह्यांमधील पक्षीमित्रांनी त्या त्या जिल्ह्यांची पक्षीसूची तयार केली आहे, पण प्रत्येक सूचीत किमान काही पक्ष्यांच्या नावांमध्ये एकवाक्यता नाही.
मात्र, याचा अर्थ ही नावे चुकीची आहे असा नाही. त्यामुळे सर्वाना समजेल अशा सहज सोप्या भाषेतील पक्ष्यांच्या मराठी नावांची प्राथमिक सूची तयार झाली असून, त्यावर राज्यातील पक्षी अभ्यासकांकडून सूचना आल्यानंतर दुरुस्तीनंतर पुढील पक्षीमित्र संमेलनात पुस्तकांच्या रूपाने ही सूची प्रकाशित केली जाणार आहे.
पक्ष्यांचा अभ्यास आणि त्यांच्या नावांच्या बाबतीत अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांनी केलेल्या कामाला तोड नाही. त्यांचा पक्षीकोश जगमान्य आहे. डॉ. सलीम अलींच्या पक्ष्यांच्या प्रादेशिक नावासंबंधी झालेला संवाद त्यांच्या पक्षीकोशाच्या मनोगतात दिला आहे.
त्यावरून बीएनएचएसचे (बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी) डॉ. राजू कसंबे यांना पक्ष्यांच्या सहजसोप्या मराठी नावांची कल्पना सूचली. डॉ. सलीम अली आणि मारुती चितमपल्ली या दोन दिग्गजांच्या संवादावर आधारित काही मूलभूत नियम तयार करून पक्ष्यांच्या मराठी नावांची सूची तयार करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पक्ष्यांच्या नावासंदर्भातील अनेक सूचींमध्ये एकवाक्यता नसल्यामुळे सोप्या नावांचा आधार त्यांनी घेतला, पण त्याआधी त्याचे काही नियम तयार केलेत. या नियमांच्या आधारे डॉ. कसंबे यांनी सुमारे ५४८ पक्ष्यांच्या नावांची सूची तयार केली आहे. या सूचीमध्ये स्थलांतरीत, प्रदेशनिष्ठ, पाणवठय़ांवरील, जंगलातील अशा विविध अधिवासात राहणाऱ्या पक्ष्यांचा समावेश आहे.
जातीच्या आधारावर पक्ष्यांना नावे दिली नाही, तर नाव निश्चित करण्यापूर्वी पहिल्यांदा पक्ष्यांचे गोत्र ठरवले आणि नंतर त्याच्या सर्व प्रजातींना नावे दिली. या सूचीकरिता मारुती चितमपल्ली यांचा पक्षीकोश, डॉ. सतीश पांडे, प्रमोद देशपांडे व निरंजन संत यांचे बर्ड्स ऑफ महाराष्ट्र, रिचर्ड ग्रिमेट, टीम इंस्कीप व प्रशांत महाजन यांचे दक्षिण भारतातील पक्षी या पुस्तकांचा आधार घेण्यात आल्याचे डॉ. राजू कसंबे यांनी सांगितले.
पक्ष्यांच्या नावासाठी नियम
* पक्षाच्या गोत्रासाठी योग्य नाव ठरवले जावे. म्हणजेच किंगफिशरच्या सर्व प्रजातीसाठी ढिवर.
* पक्ष्यांच्या प्रजातीसाठी नाव ठरविताना इंग्रजी सामान्य नाव आधार म्हणून वापरायचे. त्यात समस्या आल्यास त्याच्या शास्त्रीय नावाचा अर्थ समजून व तर्क वापरून मराठी नाव तयार करायचे.
* नावे शक्यतो सध्या बोलल्या जाणाऱ्या मराठीत असावीत आणि ती संस्कृतप्रचुर नसावीत.
* आधीच प्रसिद्ध झालेली नावे तशीच राहू द्यायला हरकत नाही.
* अर्थहीन तरीही अनेकदा वापरली गेलेली नावे टाळावीत.
* अडचण वाटल्यास पक्ष्याच्या आवाजावरून तसेच सवईवर आधारित नावे ठेवावीत.

Sharad Pawar insulted daughters-in-law of Maharashtra strong reaction from Ajit Pawar group on that statement
“शरद पवारांनी महाराष्ट्रातील सुनांचा अपमान केला”, ‘त्या’ वक्तव्यावरून अजित पवार गटाची तीव्र प्रतिक्रिया
raj thackray mns latest news
अग्रलेख: मनसबदारच..
Maharashtra
मुद्दा महाराष्ट्राचा… महाराष्ट्र समस्यांच्या विळख्यात का?
Review of Rohini Nilekanis book Shambharital Shahanapan on durgabai Nilekani
शंभरीतलं शहाणपण!