ls-shopping-festival-spns‘लोकसत्ता मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल’ स्पर्धेचे नियम आणि अटी

१) ग्राहक ‘लोकसत्ता’च्या मुंबई शॉपिंग फेस्टिव्हलमधून मालाची/ वस्तूची खरेदी करतात, म्हणजेच कॉन्टेस्टच्या १७ दिवसांच्या कालावधीत जोडलेल्या सूचीनुसार नोंद केलेली शॉप्स, १९ डिसेंबर २०१४ पासून सदर कॉन्टेस्ट सुरू होईल व ४ जानेवारी २०१५ रोजी रात्रौ १० वाजता बंद होईल.

२) रु २५०/- ते रु ५०००/- च्या खरेदीवर एक कूपन, रु ५००१/- ते रु २०,०००/- च्या खरेदीवर पाच कूपन्स व रु २०,०००/- हून अधिकच्या खरेदीवर १० कूपन्स दिली जातील. वरील सर्व खरेदी झाल्यानंतर बिलाची रक्कम प्रदान केल्यानंतर ग्राहक कुपन्ससह बिल जोडून विचारलेल्या तपशिलासह कूपन भरतील आणि शॉपच्या प्रीमायसेसमध्ये ठेवलेल्या ड्रॉप बॉक्समध्ये कूपन जमा करतील. (रेमंड शॉप्सकरिता रु. २५००/- चा खरेदी असावयास. रेमंड शॉपमध्ये रु. २५००/- ते रु ५०००/- दरम्यान खरेदी करणाऱ्या ग्राहकास एक कूपन, रु. ५००१/- ते रु २००००/- दरम्यान खरेदी करणाऱ्या ग्राहकास ५ कूपन्स, तर रु. २०००१/- वरील खर्च करणाऱ्या ग्राहकास १० कूपन्स मिळतील.)

३) केवळ पूर्णत: भरलेली कूपन्स बक्षिसे जिंकण्यासाठी विचारात घेतली जातील.

४) दुसऱ्या दिवशी सकाळी ‘लोकसत्ता’ प्रतिनिधी विविध आउटलेट्स/ शोरूम्सकडून सर्व कूपन जमा करतील.

५) यथोचितरीत्या भरलेल्या कूपन्ससमवेत सर्व जमा केलेल्या प्रवेशिकांमधून प्रत्येक दिवशी उत्तम प्रवेशांच्या आधारावर विजेते ठरविले जातील. एका आठवडय़ात सातही दिवस विजेत्यांची निवड होईल आणि त्यांची नावे ‘लोकसत्ता’च्या मुंबई आवृत्तीत प्रसिद्ध होतील.

६) रोजच्या विजेत्यांना ‘लोकसत्ता’द्वारा निश्चित केल्याप्रमाणे शोरूम्स/ आउटलेट्समध्ये बक्षिसे देण्यात येणार आहेत. ७) प्रत्येक आठवडय़ाच्या शेवटी सर्व कूपन्समधून उत्तम प्रवेशिकांकरिता एक साप्ताहिक विजेता निवडला जाईल. साप्ताहिक विजेत्याशी ‘लोकसत्ता’चे प्रतिनिधी संपर्क साधतील आणि साप्ताहिक बक्षीस स्वीकारण्याकरिता दिवस, स्थळ व वेळ याबद्दल कळविण्यात येईल.

८) फेस्टिव्हल कॉन्टेस्टच्या शेवटच्या दिवसानंतर सर्व प्रवेशिका ‘लोकसत्ता’च्या मुंबई कार्यालयात गोळा करण्यात येतील आणि एक/ दोन बम्पर बक्षिसांचे विजेते उत्तम प्रवेशिकांद्वारे निवडण्यात येतील.

९) बम्पर बक्षीस विजेत्यांची नावे ‘लोकसत्ता’ मुंबई आवृत्तीत घोषित केली जातील.

१०) बम्पर बक्षीस विजेत्यांशी आमच्या प्रतिनिधींद्वारा संपर्क साधला जाईल आणि बक्षीस वितरण समारंभाचा दिवस, स्थळ व वेळ याबद्दल कळविण्यात येईल.

११) कॉन्टेस्टकरिता येथे प्रवेश शुल्क नाही.

१२) ग्राहकांनी बक्षिसे/ साप्ताहिक बक्षिसे/ बम्पर बक्षिसे स्वीकारण्याआधी/ त्या वेळी ‘लोकसत्ता’कडे त्यांचे नाव आणि फोटो ओळखपत्राची एक प्रत द्यावी.

१३) ‘लोकसत्ता’चा निर्णय अंतिम व बांधील राहील. यासंबंधी, वृत्तपत्राद्वारे कोणत्याही स्वरूपाचा पत्रव्यवहार केला जाणार नाही.

१४) बक्षिसे, साप्ताहिक बक्षिसे/ बम्पर बक्षिसांवरील कर, उपकर, जर असल्यास, विजेत्याद्वारा सोसावयाचा आहे व प्रदान करावयाचा आहे.

१५) सदर कॉन्टेस्ट शॉपचे मालक, कर्मचारी किंवा ‘दि इंडियन एक्स्प्रेस लि.’ कर्मचाऱ्यांकरिता लागू नाही.

१६) ‘लोकसत्ता’ कोणतीही सूचना न देता त्यासंबंधित नियम, शर्ती व अटी आणि/ किंवा कॉन्टेस्ट रद्द करणे, निलंबित करणे किंवा त्यात फेरबदल करणे, त्यात काही भर घालणे किंवा ती खंडित करण्याचा हक्क राखून ठेवीत आहेत.

१७) दैनिक बक्षिसे, साप्ताहिक बक्षिसे/ बम्पर बक्षिसांऐवजी कोणतीही भरपाई किंवा रोख मिळणार नाही. जर दैनिक बक्षिसे/ बम्पर बक्षिसे फोटो ओळखपत्रे सादर करून करारनिविष्ट तारीख व वेळेत गोळा केली नाहीत तर ती ‘लोकसत्ता’च्या स्वेच्छाधिकारावर जप्त केली जातील.

१८) दैनिक बक्षिसे/ साप्ताहिक बक्षिसे/ बम्पर बक्षिसे ‘जशी आहेत तशी’ देण्यात येतील किंवा ‘लोकसत्ता’ दैनिक बक्षिसे/ साप्ताहिक बक्षिसे/ बम्पर बक्षिसे याकरिता वॉरंटी देत नाही किंवा प्रतिनिधी नेमलेले नाहीत, ती ‘जशी आहेत तशी’ दिली जातील.

१९) बक्षिसे रक्कम स्वरूपात दिली जाणार नाहीत.

२०) मुंबई न्यायालये एकमेव अधिकारिता असतील.