मनुष्यबळ विभागात वरिष्ठ पदावर काम केलेले आणि गेली बारा वर्षे व्यक्तिमत्व विकासविषयक कार्यशाळा घेणारे अरविंद खानोलकर यांनी आपल्या प्रदीर्घ अनुभवावर आधारित ‘यश एका पावलावर’ हे पुस्तक लिहिले आहे. ‘मॅजेस्टिक पब्लिकेशन’ने प्रकाशित केलेले हे पुस्तक या प्रकाशन संस्थेकडून राज्यातील सर्व महाविद्यालयांना भेट म्हणून देण्यात येणार आहे.तरुणांनी आत्मसन्मान, सकारात्मक विचार, एखादे ध्येय ठरवून त्याचा पाठपुरावा करणे, परस्पर उत्तम संबंध, वेळेचा सदुपयोग आदी विविध विषयांवर उदाहरणांसहित मार्गदर्शन करण्यात आले आहे. हे पुस्तक आयडीबीआय एम्प्लॉईज गुगल समूह यांच्या सौजन्याने महाराष्ट्रातील महाविद्यालयांना भेट देण्यात येणार आहे. ज्या महाविद्यालयांना हे पुस्तक हवे असेल त्यांनी आपल्या संस्थेच्या लेटरहेडवर प्राचार्य व संस्थेच्या अध्यक्षांच्या स्वाक्षरीसह लेखी पत्र मॅजेस्टिक पब्लिकेशन, विष्णु निवास, सेनापती बापट मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई-२८ येथे पाठवावे, असे आवाहन प्रकाशन संस्थेने केले आहे.अधिक माहितीसाठी ०२२-२४३०५९१४ या क्रमांकावर संपर्क साधावा.