कृषिपंप वीज जोडणीसाठी अर्ज करूनही अद्याप ‘फर्म कोटेशन’ न मिळालेल्या ग्राहकांनी महावितरणच्या संबंधित उप विभागाशी सात मार्चपूर्वी संपर्क साधण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
अर्ज करूनही फर्म कोटेशन न मिळाल्याच्या तक्रारी महावितरणकडे करण्यात आल्या होत्या. यावर तोडगा काढून कृषी ग्राहकांना लवकरात लवकर वीज जोडणी देण्याचा प्रयत्न महावितरणकडून करण्यात येत आहे. शुन्य प्रलंबनासाठी महावितरण प्रयत्नरत असून या दृष्टिने महत्वाचे पाऊल महावितरणने उचलले आहे. महावितरणच्या कार्यालयाने पोच दिलेली नाही. यासारख्या तक्रारी पुन्हा येऊ नयेत म्हणून महावितरणच्या वतीने स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्यात येत आहे. लवकरात लवकर वीज जोडणी मिळावी यासाठी ग्राहकांनी अर्ज सादर केल्याचा पुरावा म्हणून महावितरणचा शिक्का असलेला परिपूर्ण अर्ज सादर करणे आवश्यक आहे. ग्राहकांनी सदर अर्ज उपविभागीय कार्यालयात सात मार्चपूर्वी सादर करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.