डिसेंबरची गुलाबी थंडी आणि शॉपिंग यांचा मेळ दरवर्षी पाहायला मिळतो. नव्या वर्षांचे दिमाखदार स्वागत करण्यासाठी सर्वचजण आतुर असतात, त्यामुळे या दिवसांमध्ये खरेदीला उधाण येते. याचेच औचित्य साधत ‘लोकसत्ता’च्या वाचकांना खरेदीचा पुरेपूर आनंद मिळावा आणि त्याचसोबत भरघोस बक्षिसे मिळण्याची संधी देण्यासाठी १९ डिसेंबर ते ४ जानेवारी दरम्यान ‘मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल’ आयोजित केला आहे. गेल्या काही दिवसांपासून रसिकांचे लाडके कलाकार या ‘शॉपिंग फेस्टिव्हल’निमित्त दुकानांना भेटी देत आहेत. बुधवारी या फेस्टिव्हलला भेट देण्यासाठी आणि ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री आदिती सारंगधर हिने दादर पश्चिम विभागातील काही दुकानांना भेट दिली.

mv02

             ‘पानेरी’च्या विनोद गाडांसोबत आदिती सारंगधर

दादरचा कबुतरखाना ते प्लाझा चित्रपटगृहापर्यंतचा परिसर दिवसाच्या कोणत्याही प्रहरी कायमचा गजबजलेला असतो. बुधवारी अशाच सायंकाळच्या गर्दीच्या वेळी दादरच्या लागू बंधू, पानेरी, हस्तकला हेरिटेज या दुकानांमध्ये खरेदी करायला गेलेल्या ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी विविध मालिका आणि सध्या गाजत असलेल्या ‘प्रपोजल’ या नाटकातील सशक्त अभिनयासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री आदिती सारंगधर आली होती.
दागिने, साडय़ा म्हणजे तमाम स्त्रीवर्गासाठी जीव की प्राण. आदितीने आपल्या सफरीची सुरुवातच केली ती मुळात, ‘लागू बंधू’ यांच्या हिरे आणि मोत्यांच्या दुकानापासून. तिने वेगवेगळ्या प्रकारचे हिऱ्याचे आणि मोत्यांचे दागिने पाहिले. पण तिच्या खास पसंतीस उतरले ते, मोत्यांचे दागिने. दागिन्यांमध्ये मोती तिचा लाडका असल्याने, मोत्यांचे दागिने घालून पाहण्याचा मोह तिला आवरला नाही. त्यानंतर तिचा मोर्चा वळला तो, ‘पानेरी’च्या साडय़ांच्या दुकानामध्ये. आदितीची साडय़ांबाबतीत पसंती होती, पारंपरिक कांजीवरम साडय़ांना. काजींवरम साडय़ांच्या श्रीमंतीने आदितीचे मन जिंकलेच, पण ‘हस्तकला हेरीटेज’मधील कॉटनच्या सुंदर हाताने प्रिंट केलेले सलवार सूटही तिला तितकेच भावले. यावेळी दुकानांमध्ये उपस्थित ग्राहकांना तिच्यासोबत फोटो काढून घेण्याची संधीही मिळाली.

mv03

 ‘लागू बंधू’च्या आसावरी लागू आणि त्यांचे कर्मचारी यांच्यासोबत फोटो काढताना आदिती सारंगधर.

‘रिजन्सी ग्रुप’ हे या मुंबई शॉपिंग फेस्टिव्हलचे मुख्य प्रायोजक आहेत. त्याशिवाय ‘जनकल्याण सहकारी बँक लिमिटेड’ हे या फेस्टिव्हलचे सहप्रायोजक आहेत. ‘रेमंड शॉप’ हे ‘स्टायलिंग पार्टनर’, अंजली मुखर्जी यांचे हेल्थ टोटल हे ‘हेल्थ पार्टनर’, लागू बंधू आणि वामन हरी पेठे ‘प्लॅटिनम पार्टनर’ असतील.
अपना बाजार, पितांबरी आणि दादर येथील पानेरी यांच्या सहकार्याने हा महोत्सव होत आहे. वीणा वर्ल्ड हे ‘ट्रॅव्हल पार्टनर’ आहेत. स्लीम अँड स्लेंडर ‘वेल बीइंग पार्टनर’ म्हणून आहेत.
त्याशिवाय टोटल स्पोर्ट्स, केम्ब्रिज रेडीमेड्स – कुलाबा, राणेज् पर्सेस, रेन्बो गारमेंट्स, रोनाल्ड फूड प्रोसेसर, विधि ज्वेलर्स, अतुल इलेक्ट्रोनिक्स, सारी पॅलेस, परफेक्ट ऑप्टिक्स हे ‘गिफ्ट पार्टनर्स’ आहेत. या सर्वासोबतच ‘महिंद्रा गस्टो’ची टेस्ट राइड करणाऱ्यांनाही बक्षिसे मिळवण्याच्या सुवर्णसंधीचा लाभ मिळवता येईल. ‘महिंद्रा गस्टो’ हे या फेस्टिव्हलचे ‘टेस्ट राइड पार्टनर’ आहेत.

mv04

 ‘हस्तकला हेरिटेज’च्या प्रमिला गोरा आणि अरविंद मारु आणि ‘बी. वाय. पाध्ये पब्लिसिटी’चे श्रीराम पाध्ये यांच्यासोबत आदिती सारंगधर.

संपदा जोगळेकरच्या हस्ते आज पारितोषिक वितरण
‘मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल’चा पारितोषिक वितरण समारंभ, नायगावच्या ‘अपना बाझार’ येथे शुक्रवार दिनांक २६ डिसेंबर रोजी सायंकाळी पावणेपाच वाजता पार पडणार आहे. या वेळी प्रसिद्ध अभिनेत्री आणि मुलाखतकार संपदा जोगळेकर हिच्या हस्ते विजेत्यांना गौरवण्यात येणार आहे.

१९ डिसेंबर
वैभव महाडिक (अंधेरी,पू.), सुगंधा शेट्टी (विलेपार्ले, पू.), उदय झोपे (बोरिवली, पू.), रंजना भोईर (लोअर परेल), रेणू सारंगधर, यशपाल मुंबारकर (चारकोप), मानसी बडवे (वडाळा), सुनीता बोरकर (माहीम), अनिल मोने, फिल्जी फ्रेड्रिक.

‘मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल’च्या १९ डिसेंबर ते २२ डिसेंबर दरम्यानच्या विजेत्यांची नावे
२० डिसेंबर

अनघा पाटील (उरण), श्रीकुमार चव्हाण (गोरेगाव), सत्यविजय पावटे (परेल), चारुल पडवळ (बोरिवली), सुप्रिया मोहिते (परेल), गोपी शहा (बोरिवली), नितीन वयकर (घाटकोपर), मनोज कोतवाल (भांडुप), विभव पंडित (बोरिवली), गौराज पंडित (विक्रोळी).

२१ डिसेंबर
प्रशांत घाडी (जोगेश्वरी), स्वप्ना कुलकर्णी (दादर), महादेव गजरे (मानसरोवर), नीता यादव (कांदिवली), नूतन सोहनी, पूर्णिमा सानबाग (विलेपार्ले), दर्शन वानखेडे, सुश्मिता कमलाकर (कांदिवली).

२२ डिसेंबर
रवींद्र सुरमलकर (मुलुंड), प्रीती चव्हाण (दादर), केतकी दाबके (मलाड), अंजली कंटक (वरळी), शीला देशपांडे (बोरिवली), अर्चना कोयडे, महेश दाभिलकर (एलफिल्टन), डेनिझ रॉड्रिज (वरळी).