वरळीच्या नेहरू सेंटरच्या सांस्कृतिक विभागातर्फे २३ व्या ‘मराठी संगीत नाटक महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे.
११ ते १४ ऑगस्टदरम्यान केंद्राच्या डिस्कव्हरी ऑफ इंडिया इमारतीतील सभागृहात हा कार्यक्रम होईल. ११ ऑगस्टला ‘संगीत मला वेड लागले संतांचे’, १२ ऑगस्टला ‘संगीत प्रीतिसंगम’, १३ ऑगस्टला ‘संगीत कान्होपात्रा’ आणि १४ ऑगस्टला ‘संगीत स्वर्गीय घोटाळा’ यांचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव विनामूल्य असून प्रवेशपत्रिका ७ ऑगस्ट रोजी नेहरू सेंटरच्या सभागृहाच्या आरक्षण खिडकीवर सकाळी १०.३० वाजल्यापासून उपलब्ध असतील.
विज्ञानविषयक उपक्रमांबरोबरच संस्थेतर्फे व्याख्याने, परिसंवादांचेही आयोजन केले जाते, तर सांस्कृतिक विभागातर्फे नृत्य, नाटय़ व संगीत या क्षेत्रातील अभिजात कलाही रसिकांसमोर सादर करण्याचा केंद्राचा प्रयत्न असतो.