गोरेगाव आणि जोगेश्वरी येथील विकास हस्तांतरणातून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) १५० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. निविदा दस्तावेज व यशस्वी निविदाकारांची घोषणा पडताळणी समितीकडून येत्या महिनाभरात केली जाणार आहे.
गोरेगाव आणि जोगेश्वरी येथील निरलॉन, नेस्को आणि आजगावकर भूखंडावरील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पामुळे ३० हजार चौरस फूट जागेचा मिळालेला विकास हस्तांतरण अधिकार विकल्यामुळे ‘एमएमआरडीए’ला १५३ कोटी ९८ लाख ८ हजार १४ रुपये इतके उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे.
गोरेगाव येथील निरलॉन भूखंडासाठी दर चौरस मीटरला ५२ हजार रुपये, नेस्को भूखंडासाठी दर चौरस मीटरला ५१ हजार आणि जोगेश्वरी येथील भूखंडासाठी ५१ हजार २५ रुपये इतकी बोली लागली आहे. उपरोक्त विकास हस्तांतरण अधिकारांसाठी १४ कंपन्यांनी निविदा दाखल केल्या आहेत.