मुंबई महापालिकेने नुकतीच ज्यांनी वयाची ८० वर्षे पूर्ण केली आहेत त्यांच्या कुटुंब निवृत्तिवेतनात एप्रिल २०१४ पासून १० टक्के इतकी मूळ वाढ मंजूर केली आहे; परंतु काही निवृत्तिधारकांना त्यांच्या जन्मदिनांकाची नोंद महापालिकेच्या दप्तरी नसल्यामुळे ती त्यांना देण्यात आली नाही, अशा निवृत्तिवेतनधारकांना सहकार्य करण्यासाठी मुंबई म्युनिसिपल पेन्शनर्स असोसिएशनने त्यांच्या कार्यालयात सोमवार ते शुक्रवार दुपारी २.३० ते ५.३० या वेळेत भेटण्याचे आवाहन केले आहे.  प्रत्यक्ष भेटीच्या वेळी जन्मतारखेचा दाखला, कुटुंब निवृत्तिवेतन पुस्तिका, निवृत्तिवेतन बँक पुस्तिका, पॅन कार्ड आणि त्यांच्या छायांकित प्रती जी/उत्तर विभाग कार्यालय रूम नं. ९, तळमजला जे.के. सावंत मार्ग, दादर येथील कार्यालयात आणावेत. अधिक माहिती दूरध्वनी क्र. २४३९७९३३, २४३९७८०० वर संपर्क साधावा, असे असोसिएशनने एका पत्राद्वारे कळविले आहे.