संगीतरत्न अब्दुल करीम खाँ यांच्या ७९ व्या पुण्यतिथीनिमित्त मिरजेच्या मिरारसाहेब दर्गा परिसरातील ऐतिहासिक चिंचेच्या झाडाखाली संगीत सभेस बुधवारी प्रारंभ झाला.  खाँ साहेबांच्या शिष्यांनी संगीत सेवा सादर करून आदरांजली वाहिली.
  डोंबिवलीच्या समीर अभ्यंकर यांनी ललत राग आळविला. उ. फारूक लतीफ खान (मुंबई) यांनी सारंगी वादनात चारूकेशी राग वाजविला. कोल्हापूरच्या पं. किशोर कागलकर यांनी गुजरी तोडी रागामध्ये गायन केले. पं. चंद्रशेखर वझे (मुंबई) यांनी जाउनपुरी हा राग आळविला. पुण्याच्या चंद्रशेखर गाडगीळ यांनी गझल गायन केले. तर पं. सहदेव झेंडे (कवलापूर) यांनी बैरागी रागात गायन केले.  
पहिल्या सत्रातील संगीत सभेला तबल्यावर दादा मुळे, जितेंद्र भोसले, सुनील राजे, सागर सुतार आणि पेटीवर अजित पुरोहित, सिद्धेश बिचोलकर यांनी साथसंगत केली. तीन दिवसांच्या संगीत सभेसाठी मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, हुबळी, बेंगलोर, चैन्नई, धारवाड आदी ठिकाणचे पन्नास कलाकार संगीत सेवा सादर करणार आहेत.