राज्यस्तरीय समता महाकरंडक एकांकिका स्पध्रेत नागपूरच्या राघे महाविद्यालयाच्या संघाने सादर केलेल्या ‘टोबा टिक सिंग’ एकांकिकेने यंदाचा समता महाकरंडक पटकावला.
समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष अॅड. सुभाष राऊत यांच्या वतीने आयोजित केलेल्या स्पध्रेत राज्यभरातील संघांनी मोठय़ा संख्येने सहभाग नोंदविला. विजेत्या संघास माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, सिनेअभिनेते अंकुश चौधरी, मििलद िशदे, गिरीश परदेशी, किशोरी अंबिये, डॉ. सुधीर निकम व संयोजक अॅड. सुभाष राऊत यांच्या उपस्थितीत पारितोषिक देण्यात आले. मुंबईच्या श्री साई सानिध्य क्रिएशनच्या ‘राजा’ एकांकिकेस दुसरे, तर लोकरंग संस्था, औरंगाबादच्या ‘बेचारा उस्मान’ एकांकिकेला तिसरे पारितोषिक देण्यात आले. प्रेक्षक पसंती पुरस्कार ‘त्या साडेसहा रुपयांचे काय केले?’ (सोलापूर), शेख महंमद मराठी माध्यम (औरंगाबाद), सर्वोत्कृष्ट महिला कलाकार ‘बिटविन द लाईटस’ (सेजल मुंबई), सर्वोत्कृष्ट अभिनेता (टोबा टिक सिंग), सर्वोत्कृष्ट वेशभूषा, रंगभूषा डॉ. विनय िशदे (बेचारा उस्मान, औरंगाबाद), सर्वोत्कृष्ट प्रकाश नेपथ्य आधार संस्था (सिल्लोड), सर्वोत्कृष्ट संगीत एस. राम (टोबा टिक सिंग), सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक सुरेश पवार (नागपूर), सर्वोत्कृष्ट लेखन वैभव सातपुते (राजा मुंबई) यांना प्रदान करण्यात आले. सूत्रसंचालन अजय शेरकर व अमृता काळे यांनी केले.