समाजमाध्यमांचा वापर करून सामान्यांपर्यंत पोहोचणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता व्हायबरच्या माध्यमातूनही सामान्यांशी चर्चा करणार आहेत. देशाच्या ६६व्या प्रजासत्ताकदिनी त्यांनी व्हायबरवरून व्हायबर वापरकर्त्यांशी पहिला संवाद साधला. अवघ्या दोन दिवसांत त्यांच्या या पब्लिक चॅटला साडेचार लाखांहून अधिक फॉलोअर्स मिळाले आहेत.व्हायबर या मोफत कॉलिंग अ‍ॅपमध्ये काही महिन्यांपूर्वी पब्लिक चॅट नावाची सुविधा सुरू करण्यात आली. यामध्ये विविध क्षेत्रांतील मान्यवर आपल्याशी काही गोष्टी शेअर करणार आहेत. यामध्ये सध्या सचिन तेंडुलकरसह अनेक प्रसिद्ध हॉलीवूड कलाकारांचा समावेश आहे. यामध्ये आता पंतप्रधान मोदी यांचाही समावेश झाला आहे. मोदी यांचे व्हायबर अपडेट्स मिळवण्यासाठी व्हायबरचे ५.१ हे व्हर्जन आपल्या फोनमध्ये असणे गरजेचे आहे. यानंतर तुम्ही तेथे असलेल्या पब्लिक चॅट या पर्यायामध्ये जाऊन मोदी यांना फॉलो करू शकता. मोदी यांनी प्रजासत्ताकदिनी राजपथावरची काही छायाचित्रे, मोदी-ओबामा भेटीतील क्षणचित्रे व्हायबरवर शेअर केली होती.