मुंबईसारख्या महानगरात असलेल्या संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये रोज फिरायला जाणाऱ्यांची संख्या हजारोंमध्ये असते. संध्याकाळी पाच वाजले की उद्यानाचे दरवाजे सर्वासाठी बंद होतात. आता मात्र पर्यटकांसाठी संध्याकाळी पाच वाजता दरवाजे खुले केले जाणार आहेत. पर्यटकांसाठी मुक्कामाची सोय असलेली जंगल भटकंती सुरू होत आहे. रात्रीच्या नीरव शांततेमधील राष्ट्रीय उद्यानाचा भन्नाट अनुभव घेण्याची संधी त्यामुळे प्रथमच उपलब्ध होत आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील झाडे, पशू-पक्षी पाहण्यासाठी, कान्हेरी गुंफांमधील प्राचीन इतिहास समजून घेण्यासाठी, धबधबा आणि नदीमध्ये डुंबण्यासाठी, तलावात बोटीमधून फिरण्यासाठी.. दिवसाला हजारो पर्यटक येतात. निसर्ग अभ्यासकांना राहण्यासाठी राष्ट्रीय उद्यानात निवासाचीही सोय आहे. मात्र सोबत मार्गदर्शक नसल्याने सर्वसाधारण पर्यटकांना त्याचा फारसा उपयोग होत नाही. आता मात्र लहानांपासून मोठय़ांपर्यंत कोणालाही निसर्गाशी जोडून घेण्यासाठी राष्ट्रीय उद्यानाकडून नव्या स्वरूपात या सुविधा उपलब्ध होत आहेत.
संजय गांधी उद्यानातील रात्रीचा अनुभव घेण्यासाठी तंबू तसेच सामुदायिक निवासस्थानाची व्यवस्था करण्यात आली आहे. शनिवार २० डिसेंबरपासूनच त्याची सुरुवात होत आहे. पर्यटकांच्या प्रतिसादानुसार आणि ऋतुमानानुसार कार्यक्रमांचे स्वरूप व आखणी बदलत जाईल. राष्ट्रीय उद्यानाची माहिती, त्यानंतर आकाशदर्शन, रात्रीचे जेवण व सकाळच्या गारव्यामध्ये पक्ष्यांची माहिती देण्याचे कार्यक्रम सध्या आखण्यात आले आहेत. खगोलमंडळ आणि पक्षीतज्ज्ञ परवीश पंडय़ा या कार्यक्रमांत मार्गदर्शक असतील, अशी माहिती राष्ट्रीय उद्यानातील निसर्ग माहिती केंद्रातील रेखा महाले यांनी दिली.

-कसे बुकिंग कराल- २८८४ ७८०० या क्रमांकावर माहिती मिळवता येईल. नोंदणी मात्र प्रत्यक्ष बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या कार्यालयात जाऊन करावी लागेल.
’ सहलीचे स्वरूप – शनिवारी संध्याकाळी पाच ते रविवारी सकाळी साडेदहा.
_पाच वाजता प्रवेश, त्यानंतर राष्ट्रीय उद्यानाची ओळख करून देणारा माहितीपट, संध्याकाळी सात ते रात्री नऊ या काळात आकाशदर्शन, पहाटे सहा वाजता पक्षीनिरीक्षण.
_याशिवाय ऋतुमानानुसार फुलपाखरांची माहिती, मशरूमची सर, कीटकांची सफर असे कार्यक्रम होतील.
_शुल्क – प्रत्येक व्यक्तीसाठी २००० रुपये. संध्याकाळची चहा-कॉफी, रात्रीचे जेवण, सकाळची न्याहरी अंतर्भूत.
_ सुरुवातीला केवळ २५ पर्यटकांसाठी सोय.
_ त्यानंतर तंबूही उपलब्ध होणार. चार जणांच्या तंबूसाठी २५०० रुपये.

सांताक्रूझ-चेंबूर जोड रस्त्यावर ‘भंगार’कोंडी
सांताक्रूझ-चेंबर जोड रस्ता प्रकल्पात कुर्ला रेल्वेस्थानकाबाहेरील वांद्रे-कुर्ला संकुलाकडे जाणारा उड्डाणपुलाचा रस्ता गाडय़ांच्या दुरुस्ती-मोडतोडीची कामे करणाऱ्या गॅरेजने अडवला आहे. त्यामुळे उड्डाणपुलाच्या तोंडावरच वाहतुकीची कोंडी होते. हा अडथळा हटवण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे.  सांताक्रूझ चेंबूर जोड रस्ता हा प्रकल्प पूर्व आणि पश्चिम उपनगरे जोडणारा महत्त्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे पूर्व उपनगरांतून विमानतळाकडे जाणाऱ्या आणि पश्चिम उपनगरांतून ठाणे, नवी मुंबई, नाशिक, पुणे, पनवेलकडे जाणाऱ्या वाहनधारकांचा प्रवास सुकर झाला . तसेच वेळेची आणि कोटय़वधी रुपयांच्या इंधनाचीही बचत होत आहे.
छाया: वसंत प्रभू