नवी मुंबई महानगरपालिकेच्या मागील सर्वसाधारण सभेमध्ये नेरुळगावच्या मौदानावरुन राष्ट्रवादी कॉग्रेसचे नगरसवेक सुरज पाटील यांच्या परिवारावरुन व्यक्तिगत आरोप  केल्यामुळे  नामदेव भगत यांच्या विरोधात नगरसेवक सुरज पाटील यांनी महापौर व सभागृहातील सदस्यांचा सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत आक्षेप घेऊन निषेध व्यक्त केला. यावेळी शिवसेना व राष्ट्रवादी कॉग्रेस च्या नगरसेवकांमध्ये चांगलीच जुंपली.
मागील सर्वसाधरण सभागृहामध्ये नगरसेवक नामदेव भगत यांनी नगरसेवक सुरज पाटील यांच्या विरोधात आक्षेपार्ह शब्द काढले. मात्र ते इतिवृत्तामध्ये छापून आले नाही. तसेच महापौरानी नामदेव भगत यांच्यावर कोणत्याही प्रकाराचा जाब न विचारता  कारवाई  केली नाही असा सवाल  सुरज पाटील यांनी उपस्थित केला. सभागृहामध्ये एखाद्या सदस्याच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केले जाते तो सभागृहाचा अवमान असून महापौरांनी कारवाई करायला पाहिजे पण कोणत्याही प्रकारची कारवाई न आल्यामुळे सुरज पाटील व राष्ट्रवादी कॉग्रेसच्या नगरसेवकांनी  यांनी निषेध व्यक्त करत सभागृहात ठिय्या मांडला. तर विरोधी पक्ष नेता सरोज पाटील यांनी ज्यावेळी नगरसेवक नामदेव भगत यांनी आक्षेपार्ह विधान केले त्यावेळी सदस्यांनी आक्षेप का घेतला नाही. सुरज पाटील सभागृहास वेठीस धरत असून महापौराचा अपमान करीत आहे. असे आक्षेप घेत शिवसेनेचे नगरसेवक सभागृहातून बाहेर पडले. यावंर महापौर सागर नाईक यांनी सचिव विभागला रेकॉडिंग ऐकून इतिवृत्तान्तमध्ये दुरुस्ती करुन घ्यावी असे आदेश दिले. त्यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या नगरसेवकांनी निषेध मागे घेतला.