परदेशातून महागडा कृत्रिम पाय आयात करण्याऐवजी स्थानिक पातळीवरील काही साहित्य आणि उपलब्ध तंत्रज्ञानाचा कौशल्यपूर्वक वापर करून कमी किमतीत कृत्रिम पाय तयार करण्याचे काम शक्य असल्याचे येथील श्री महावीर तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी सिद्ध केले आहे. अस्थिरोगतज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन निर्मिलेल्या ‘हायटेक नी मॅकेनिझम’ या कृत्रिम पायाचे स्वामित्व हक्क (पेटंट) मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
अपघातात पाय गमावलेल्या, काही कारणास्तव शस्त्रक्रियेद्वारे पाय गमावलेल्या रुग्णांसाठी तयार केलेले ‘हायटेक क्नी मॅकेनिझम’ संजीवनी ठरणार असल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला. विदेशातून आयात केल्या जाणाऱ्या ‘हायटेक नी’मध्ये हायड्रॉलिक्स सिस्टीम, सिलिंडर्स तसेच न्युमेटिक्सचा वापर केला जातो. भारतातील मान्यताप्राप्त जयपूर फूट हा ‘मॅन्युअल ऑपरेटेड’ तसेच लॉकिंग सिस्टीमवर आधारित आहे. हायटेक क्नी मॅकेनिझममध्ये तो उपलब्ध नाही. यामुळे या क्षेत्रात भारताला संशोधनास भरपूर वाव असल्याचे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी या तंत्रावर आधारित कृत्रिम पायाची निर्मिती केली. गिरीश चव्हाण, रोहित वालझाडे आणि मनीषकुमार चौधरी हे विद्यार्थी गेल्या काही महिन्यांपासून त्यावर काम करत आहेत. विद्यार्थ्यांनी बनवलेल्या हायटेक नीमध्ये ‘स्पिंग मॅकेनिझम’चा वापर करण्यात आला असून त्याचे काम स्वयंचलित पद्धतीने चालते. त्यामुळे अपंग व्यक्तींना इतर आधाराची गरज भासत नाही. हा पाय गुडघ्यात १२० अंशात फिरू शकत असल्यामुळे दैनंदिन कामकाजात कृत्रिम पायाकडे अधिक लक्ष देण्याची गरज अपंग व्यक्तींना भासत नाही.
या कृत्रिम पायासाठी मोल्डिंग अपंग व्यक्तीच्या पायाच्या आकारानुसार मोजमाप घेऊन करता येईल. विद्यार्थ्यांनी दोन्ही पायांसाठी एकच तंत्रज्ञान वापरले आहे. त्यामुळे फक्त पायाचा उजवा किंवा डावा पंजा बदलावा लागतो, परंतु इतर कृत्रिम पायात मात्र तंत्रज्ञानासह इतरही अधिक बदल करावे लागत असल्याने त्यासाठी खर्च जास्त येतो. विद्यार्थ्यांना हा कृत्रिम पाय तयार करण्यासाठी ३० हजार रुपये खर्च आला. व्यापारी तत्त्वावर जर त्याचे उत्पादन झाले तर किंमत कमी होईल, अशी अपेक्षा आहे. या संदर्भात अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. सागर पाटोळे, महाविद्यालयाच्या अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख प्रा. पंकज धर्माधिकारी, प्रा. किरण जोंधळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.
‘आर्थिकदृष्टय़ा परवडणारे संशोधन’
‘हायटेक क्नी मॅकेनिझम’चा कृत्रिम पाय ‘बायोमेकॅनिक्स’सारखाच काम करत असून युरोप-अमेरिकेतून आयात कराव्या लागणाऱ्या कृत्रिम पायापेक्षा तो परवडणारा आहे. गरीब अपंग व्यक्तीही तो खरेदी करू शकतील, असे शहरातील अनेक डॉक्टरांनी म्हटले आहे. विद्यार्थ्यांनी निर्मिलेला कृत्रिम पाय आर्थिकदृष्टय़ा परवडणारा व आरामदायक आहे, असे डॉ. सागर पाटोळे, डॉ. नीलेश कुंभारे, डॉ. चेतन कातकाडे यांनी सांगितले.

Loksatta explained Is Apple ReALM better than ChatGPT
ॲपलचे ReALM चॅटजीपीटीपेक्षा सरस? येत्या जूनपासून ‘एआय’ क्षेत्रात धुमाकूळ?
Loksatta kutuhal Scope of computer vision
कुतूहल: संगणकीय दृष्टीची व्याप्ती
Robert Dennard
चिप-चरित्र : ‘मेमरी चिप’ क्षेत्राची पायाभरणी
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…