अनोळखी शहरात गेल्यावर ज्याप्रमाणे गुगल मॅप अनेकदा आपली मदत करतो. पण मुंबईच्या लोकलबाबतची तपशीलवार माहिती देण्यात गुगल मॅपसह सध्या अस्तित्वात असलेल्या अनेक नकाशांमध्ये काही ना काही कमी आहे. ही कमी दूर करून मुंबईतील उपनगरीय रेल्वे वाहतुकीचा परिपूर्ण नकाशा आयआयटी मुंबईतील इंडस्ट्रिअल डिझाइन केंद्र (आयडीसी)मधील जयकिशन पटेल या विद्यार्थ्यांने तयार केला आहे. त्याचा हा नकाशा पश्चिम रेल्वेवरील वांद्रे आणि दादर या स्थानकांवर लावण्यात आला असून मोबाइल अ‍ॅप स्वरुपातही उपलब्ध करून दिला आहे.
मुंबईची उपनगरीय लोकल वाहतूक मध्य, पश्चिम आणि हार्बर या प्रमुख मार्गावरून होत असली तरी त्यात ट्रान्स हार्बर, दिवा-रोहा, दिवा-वसई यासारख्या शटल सेवांचाही समावेशे आहे. याशिवाय शहरात मेट्रो, मोनोसारख्या सार्वजनिक वाहतूक पर्यायही उपलब्ध आहेत. या सर्वाचा योग्य वापर करून प्रवास सुखकर कसा होईल हे सांगणारा परिपूर्ण नकाशा तयार करण्याची आवश्यकता ओळखून जयकिशनने वर्षभरापूर्वी हा नकाशा तयार करण्यास सुरुवात केली. यामध्ये रेल्वे मार्गाचे विविध क्रमांकामध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. या वर्गीकरणाबरोबरच शहरातील विविध महत्त्वाच्या ठिकाणी जाण्यासाठी कोणत्या स्थानकावर उतरावे व तेथून कोणत्या वाहनाचा वापर करून तुम्ही इच्छित स्थळी पाहचू शकतात याचा तपशीलही देण्यात आला आहे. यामुळे हा नकाशा परिपूर्ण ठरत असल्याचे विद्यार्थ्यांला वाटते. हा नकाशा समजण्यास सोपा असून तो इंग्रजी, हिंदी आणि मराठी या तीन भाषांमध्ये उपलब्ध आहे.
रंगांधळेपणा असलेल्या व्यक्तीलाही नकाशा वाचता यावा यासाठी त्यात विशेष रंगांचा वापर करण्यात आल्याचे जयकिशन सांगतो. नकाशा ज्या स्थानकात आहे त्या ठिकाणी ‘आपण येथे आहात’ असे नमूद करण्यात आले आहे. यामुळे नवीन प्रवाशांना त्या ठिकाणाहून त्यांच्या इच्छित स्थळी जाण्याचा मार्ग शोधण्यासाठी मदत होऊ शकते. हा प्रकल्प ‘मुंबई रेल मॅप’(एमआरएम) या नावाने ओळखला जात असून तो केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि आयआयटी मुंबईने संयुक्तपणे ‘मुंबई ट्रान्फॉरमेशन प्रोजेक्ट’च्या अंतर्गत हाती घेतला आहे. आयडीसीमधील सहयोगी प्राध्यापक मंदार राणे हे या प्रकल्पाचे मार्गदर्शक असून सध्या हे नकाशे आम्ही प्रायोगिक तत्त्वावर लावत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रवासी या नकाशांना कशा प्रकारे प्रतिसाद देतात त्यांना यात काही अडचणी आहेत का यावर आयआयटीमधील विद्यार्थी अभ्यास करत असून त्यानुसार नकाशामध्ये सुधारणा केल्या जातील असेही त्यांनी स्पष्ट केले.
या नकाशाचे मोबाइल अ‍ॅप प्लेस्टोअर आणि अ‍ॅप स्टोअरवर उपलब्ध आहे. ही साइड http://www.mrmapp.in अ‍ॅप वरून डाऊनलोड करता येईल.

Tiger from sanctuary missing after collar falls off Nagpur
‘कॉलर’ गळून पडल्याने अभयारण्यातील वाघीण ‘बेपत्ता’
Dead ants found in samosas
किळसवाणा प्रकार! कुरकुरीत समोस्यामध्ये आढळल्या मेलेल्या मुंग्या; दिल्ली विद्यापीठाच्या कॅन्टीनमधील Video Viral
navi mumbai, Valve Repair, Traffic Congestion, footpath close, Pedestrian Woes, kopar khairane, teen taki area, marathi news,
व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल; कोपरखैरणेत तीन टाकी परिसरात पदपथ बंद
Mumbai to Pune share cab fares
मुंबई ते पुणे, नाशिक आणि शिर्डी शेअर कॅबच्या भाड्यात वाढ होणार