शांत झोप लागण्यासाठी..दररोजच्या वैद्यकिय सुविधांसाठी..तसेच दैनंदिन वापरासाठी उपयुक्त ठरणाऱ्या इलेक्ट्रानिक्स यंत्रांची ओळख करून घेण्याची संधी ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने ठाणेकरांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. १६ आणि १७ जानेवारी दरम्यान विद्या प्रसारक मंडळाच्या तंत्रनिकेतन विभागाच्या वतीने आयोजित ‘नेक्स्ट जनरेशन इलेक्ट्रॉनिक्स’ परिषदेत इलेक्ट्रॉनिक्सच्या भविष्यातील प्रगतीचा वेध घेतला जाणार आहे. विद्या प्रसारक मंडळाच्या थोरले बाजीराव पेशवे सभागृहात होणाऱ्या या परिषदेत देशातील मान्यवर संशोधन संस्थांचे मान्यवर आणि परदेशातील विविध विद्यापीठांचे संशोधक उपस्थित राहणार आहे. इंडियन रिमोट सेन्सिंग डेहराडून केंद्राचे संचालक डॉ. वाय. व्ही. एन. कृष्णमुर्ती यांच्या बिजभाषणाने या परिषदेचे उद्घाटन होणार आहे.
भविष्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्रात मोठय़ा संधी उपलब्ध होणार असून या संशोधनातून मानवी जीवन अधिक सुखसोयीयुक्त करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अशा संशोधनाची ओळख या परिषदेच्या निमित्ताने ठाणेकरांना अनुभवता येणार आहे. डॉ. वाय. व्ही. एन. कृष्णमुती या कार्यक्रमाचे बिजभाषण करणार असून त्यामध्ये इंडियन रिमोट सेन्सिंग डेहराडून (आरआयएस)च्या कार्याची ओळख करण्याबरोबरच इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील घडामोडीचा उलगडा ते करतील. त्यानंतरच्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे पी. ए. नाईक यांचे भाषण होईल. इस्त्रोचे संशोधक डॉ. धनंजय पंडीत पुर व्यवस्थापन विषयावर बोलणार आहेत. भाभा अणू संशोधन विभागाचे डॉ. वैभव पाटणकर अणू क्षेत्रातील संशोधनाचे विवेचन करणार आहेत. विद्या प्रसारक मंडळाच्या पॉलीटेक्निक मधील औद्योगिक इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या वतीने आणि युके-इंडिया एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च इनिशिएटिव्ह यांच्या मदतीने ‘कृत्रिम ‘दय’या निर्मितीच्या दृष्टीने संशोधन सुरू असून या संशोधनाची माहिती ब्रिटिश कॉन्सीलच्या प्रकल्प व्यवस्थापक सुरूची परिक देतील. शिवाय वैद्यकिय क्षेत्रामध्ये इलेक्ट्रॉनिक्सचा वापर वाढला असून त्या विषयावरील संशोधनाची ओळखही त्या करतील. या बरोबरीनेच ऑस्ट्रेलियाचे प्रा. टॅन्सली, अ‍ॅस्टन विद्यापीठा बर्मिगहमचे डॉ. मार्क प्रिन्स हे परदेशी पाहुणे या परिषदेमध्ये आपले विवेचन करतील.
चांगली झोप येण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स यंत्राचा उपयोग होत असून डॉ. प्रताप कर्णिक यांच्या व्याख्यानातून हा उपयोग उलगडणार आहे. घरगुती उपचारांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स विषयावर नेहा देशपांडे, परिधान करू शकू असे इलेक्ट्रॉनिक्स यंत्रांविषयी नेहा देशपांडे मार्गदर्शन करतील. तर माधवी ठाकूर देसाई, निशा सवरेदे आणि संगीता जोशी ‘ाा नॅनो तंत्रज्ञान या विषयावर बोलणार आहेत. आयआयटी मुंबईच्या डॉ. नागेश्वरी संशोधकांसाठी आयआयटीच्या वतीने दिल्या जाणाऱ्या संशोधनाविषयक मदतीची माहिती देणार आहेत.