नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाचा २०१५-१६ वर्षांचा अर्थसंकल्प मंगळवारी परिवहन समितीच्या बैठकीत परिवहन व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांनी परिवहन समितीचे सभापती गणेश म्हात्रे यांच्याकडे सादर केला.  ६ लक्ष शिलकी रकमेचा सुधारित अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे.
सन २०१५-१६ या आर्थिक वर्षांमध्ये जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण अभियान प्रकल्प २ अंतर्गत १५८ बसेसपैकी उर्वरित १४५ बसेस प्रवासी सेवेसाठी उपलब्ध करणे, घणसोली आगार विकसित करून कार्यान्वित करणे, सार्वजनिक खाजगी सहभागातून बस टर्मिनस विकसित करणे, आय.टी.एस. प्रणाली कार्यान्वित करून ई-गव्हर्नन्सच्या दृष्टीने वाटचाल करून प्रशासकीय कामकाजावर नियंत्रण मिळवणे, प्रवाशांशी सुसंवाद साधत समाधानकारक गुणवत्तापूर्ण सेवेवर भर देणे आदी उद्दिष्टे ठेवण्यात आली आहेत.