मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- विद्यापीठ परीक्षांच्या गांभीर्यावरच प्रश्नचिन्ह
- चॅम्पियन्स ट्रॉफीतील सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या ३ बुकींना अटक
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
- ओबीसी समाज धर्मातराच्या वाटेवर
- श्रीनिवासन आगे बढो..
- 'फादर्स डे' विशेष : एक अटळ हळवा प्रवास
- ययाति आणि देवयानी
- 'नमो'नियाची बाधा
मोस्ट रीड
समुद्राच्या लाटांवर हेलकावणाऱ्या क्रूझवर रंगणाऱ्या नववर्षांच्या स्वागताच्या पाटर्य़ाची मजौ काही औरच. पण, यंदा पाटर्य़ापासून अनेकांना मुकावे लागणार आहे. कारण, खासगी क्रूझवर पाटर्य़ाच्या आयोजनाला यावर्षीही परवानगी देण्याचा पोलिसांचा विचार नाही. समुद्रकिनाऱ्यांजवळ लाटांवर हेलकावे खाणाऱ्या क्रुझवरील पाटर्य़ा एकेकाळी मुंबईच्या नवीन वर्षांच्या सेलिब्रेशनचे वैशिष्टय़ होत्या. मद्य आणि संगीताच्या तालावर ३१ डिसेंबरला रात्री सुरू होणाऱ्या या पाटर्य़ा पहाटेपर्यंत रंगायच्या. पण, २००८ मध्ये मुंबईवर समुद्र किनाऱ्यामार्गे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर नवीन वर्षांच्या स्वागतासाठी मुंबईच्या आसपास अरबी समुद्रात होणाऱ्या क्रुझ पाटर्य़ाना पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव बंदी घातली. ही बंदी आजतागायत कायम आहे. खासगी बोटींनी रात्री साडेआठच्या आत किनाऱ्यांवर परत येणे बंधनकारक करण्यात आले आहे. समुद्र किनाऱ्यांवर गस्त घालणारे पोलिस किंवा मुंबई पोर्ट ट्रस्टचे कर्मचारी रात्री साडेआठनंतर कोणत्याही बोटीला समुद्रात फिरू देत नाहीत. हा नियम यावर्षीही शिथील करण्यात आलेला नाही. यंदाही १२ डिसेंबरला मुंबई पोलिसांनी 'मुंबई मेरिटाईम बोर्डा'ला पत्र लिहून खासगी पाटर्य़ाना परवानगी देऊ नये असे कळविले आहे. त्यामुळे, यंदाही क्रूझवर खासगी पाटर्य़ा होणार नाहीत, असे बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्यामसुंदर शिंदे यांनी सांगितले.

















पण सरकारी पार्ट्या होणार. केवळ अपवाद म्हणुन.