भिवंडी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या स्टेम वॉटर ड्रिस्टिब्युशन प्रायव्हेट कंपनीने आठवडय़ातून एक दिवस ‘शट डाऊन’ घेण्याचा निर्णय घेतल्याने, बुधवारी सकाळी नऊ ते गुरुवारी सकाळी नऊ या वेळेत भिवंडी शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. पाटबंधारे विभागाने दैनंदिन कोटय़ापेक्षा अधिक पाणी उपसा करता येणार नाही, असे आदेश काढले आहेत. त्यामुळे जिल्ह्य़ातील सर्व पालिकांच्या पाणीपुरवठय़ावर परिणाम झाला आहे. 

पाटबंधारे विभागाच्या नव्या आदेशामुळे भिवंडी निजामपूर शहर महापालिकेला मंजूर कोटय़ापेक्षा दररोज दोन एमएलडी इतका पाणीपुरवठा कमी होत आहे. ही कपात भरून काढण्यासाठी आठवडय़ातील बुधवारी २४ तास पाणी बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यानुसार आय.जी.एम. टाकी, एस.टी. टाकी, ममता टाकी, भादवड टाकी, नारपोली टाकी, अंजुरफाटा, ताडाली रोड, संगमपाडा, निजामपुरा, नागाव, चािवद्रा टाकी परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.