मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- सांगली महापालिकेच्या ७८ जागांसाठी ८६१ उमेदवारी अर्ज
- कोयना धरण ४० टक्क्यांवर भरले; कराड, पाटणला रिपरिप कायम
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- विद्यापीठ परीक्षांच्या गांभीर्यावरच प्रश्नचिन्ह
- चॅम्पियन्स ट्रॉफीतील सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या ३ बुकींना अटक
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
- ओबीसी समाज धर्मातराच्या वाटेवर
- श्रीनिवासन आगे बढो..
- ययाति आणि देवयानी
- 'फादर्स डे' विशेष : एक अटळ हळवा प्रवास
- 'नमो'नियाची बाधा
मोस्ट रीड
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले यांचा मुलगा जीत आठवले 'वारस-एक इच्छा' या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत शिरकाव करत आहे. या चित्रपटात तो नायकाच्या लहानपणीची भूमिका साकारत असून त्याची भूमिका बऱ्यापैकी मोठी आणि महत्त्वाची असल्याचे चित्रपटाचे दिग्दर्शक के. विलास यांनी 'लोकसत्ता'शी बोलताना सांगितले.
राजकारण्यांची मुले चित्रपटात येणे ही गोष्ट आता नवीन राहिलेली नाही. आधी अभिनेते आणि नंतर नेते बनलेल्या खा. सुनील दत्त यांचा मुलगा संजय दत्त, विलासराव देशमुख यांचा मुलगा रितेश देशमुख अशी काही उदाहरणे देता येतील. मात्र रामदास आठवले यांच्या मुलाने येथेही बाजी मारली आहे. संजय दत्त किंवा रितेश देशमुख हे थेट नायकाच्या भूमिकेत चित्रपटात दिसले. मात्र रामदास आठवले यांच्या मुलाने लहान वयातच चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. एखाद्या विवाहित महिलेला मूल होत नसल्यास सासू-सासरे आणि नवऱ्याकडून तिचा होणारा छळ, त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या अशा सामाजिक आणि कौटुंबिक विषयावर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटात जीत आठवलेच्या मोठेपणीच्या भूमिकेत डॉ. अमोल कोल्हे असतील. त्याशिवाय अद्याप इतर कलाकारांची नावे जाहीर झालेली नाहीत. चित्रपटाची निर्मिती विश्वनाथ सपकाळे करत असून हा चित्रपट मे २०१३ मध्ये प्रदर्शित होईल.



















रामदास आठवलेसुताच्या चित्रपटाविषयी ऐकून उर भरून आला. रामदास आठवलेंचा मुलगा, म्हणजे काय बोलणार? आमच्या काही नम्र सूचना
१. जर ठाकरेंच्या मुलांनी आणि सुनेने काढलेल्या चवचाल सिनेमाला करामध्ये सूट मिळते, मग या सिनेमालासुद्धा मिळायला हवी.
२. चित्रपट प्रदर्शित करताना थिएटरमध्ये आरक्षण हवे (मराठी गटात की सर्वभाषिक गटात ते अजून नक्की नाहीये). प्रेक्षकांना देखील चित्रपट बघण्यासाठी आरक्षणाचा बडगा दाखवा. दोन किंवा तीन नेहमीचे सिनेमे बघायचे असतील तर हा सिनेमा बघावाच लागेल, नाहीतर के. विलास (यांचे खरे नाव काम विलास का?) यांचा सिनेमा बघणार कोण?
३. कोणीतरी सिनेमा बघावा म्हणून राखी सावंत, मल्लिका शेरावतचे आयटेम साँग आणि गेस्ट कलाकार म्हणून अमिताभ (बरोबर ऐश्वर्या आणि शेपूट म्हणून अभिषेक फुकट)/आमीर/सलमान/शाहरुख/करीना/कतरिना/अक्षय नाहीतर गेला बाजार अजय देवगण/संजय दत्तला तरी बोलवा.
४. तथाकथित उच्चवर्णीय नसले तरी प्रत्येक दलिताने स्वखर्चाने हा सिनेमा बघायलाच हवा. आठवलेंचा रिपब्लिकन गट तसा फतवा काढू शकतो.
५. पोराला चान्स दिला आता बापाला पण सिनेमात छोटा रोल द्याना. जोशी का कांबळे या सिनेमात चान्स मिळाला पण काय नीट जमले नाही. या टायमाला चान्स द्या, नक्की जमून येईल.