वेतनातील फरकाचे देयक तयार करून ते जिल्हा परिषदेत सादर करण्यासाठी १९ हजार रूपयांची लाच स्वीकारताना नांदगाव पंचायत समितीतील कनिष्ठ प्रशासन अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली.
तक्रारदाराची पत्नी व एक सहकारी शिक्षक आहेत. चटोपध्याय आयोगानुसार वेतनश्रेणी लागू करून वेतनातील फरकाचे देयक मिळण्यासाठी त्यांनी नांदगाव पंचायत समितीत अर्ज केला होता. अर्जानुसार वेतनातील फरकाचे तीन लाख ६८ हजार रुपयांचे देयक तयार करून नाशिक येथे जिल्हा परिषद कार्यालयात ते सादर करण्यासाठी पंचायत समितीतील कनिष्ठ प्रशासन अधिकारी सुनील बाविस्कर आणि कनिष्ठ सहाय्यक राजू संपत ढवळे यांनी तक्रारदाराकडे १९ हजार रुपयाची मागणी केली.
ही रक्कम नांदगाव रेल्वे स्थानकात स्वीकारत असताना बाविस्कर यास लाचलुचपत प्रतिबंधकच्या पथकाने पकडले