पनवेलच्या तरुण अजूनही रिक्षा परमिटच्या प्रतीक्षेत आहेत.  रिक्षा चालविण्यासाठी परमिट मिळावे यासाठी पनवेलच्या प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) ऑनलाइन सोडत पद्धत अवलंबली होती. या सोडतीमध्ये २८०० जणांनी अर्ज केले होते. मात्र सरकारी काम आणि वर्षभर थांब या उक्तीप्रमाणे पारदर्शक प्रक्रियेला उशीर लागतो, त्याप्रमाणे हे सरकारी काम सुरू आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून रिक्षाचालकांना परमिट देण्याची प्रक्रिया सुरू आहे.  सोडतीला उदंड प्रतिसाद मिळाला. सुरुवातीला या सोडतीमध्ये येणाऱ्या तरुणांना दहावी उत्र्तीण होण्याची अट होती. मात्र स्थानिक आणि प्रकल्पग्रस्तांचा विचार करून ही अट शिथिल करण्यात आली.  मार्च महिना उलटला तरीही या सोडतीचे अंतिम इरादापत्र रिक्षाचालकांना न मिळाल्याने आमदार ठाकूर यांनी रिक्षाचालकांसाठी पुढाकार घेतला. सुमारे एक हजार इरादापत्रे आणि परमिटसाठी तरुणांनी दिलेल्या कागदपत्रांच्या छाननीचे काम झाले आहे. सोमवारपासून २०० जणांच्या गटाला एकत्रितपणे इरादापत्रांचे वाटप जाहीर होणार असल्याचे आरटीओच्या सूत्रांकडून समजते.