कविश्रेष्ठ वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून महाराष्ट्र शासनाच्या वतीने साजरा करण्यात येणार असल्याने येथील उत्तर महाराष्ट्र प्रदेश जलसंपदा विभाग आणि शासकीय कर्मचाऱ्यांचे सार्वजनिक वाचनालय यांच्या वतीने या दिवशी काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा दुपारी २ ते ६ या वेळेत वाचनालयात होणार असून महाविद्यालयीन आणि खुला असे दोन गट त्यासाठी आहेत. प्रत्येक स्पर्धकाने स्वरचित एक कविता सादर करावयाची आहे.
बक्षीसप्राप्त कवींना ग्रंथभेट, सन्मानपत्र, गुलाबपुष्प देण्यात येणार आहे. स्पर्धेचा निकाल व पारितोषिक वितरण त्याच दिवशी होणार आहे. या स्पर्धेत इतरांसह शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन उत्तर महाराष्ट्र जलसंपदाचे मुख्य अभियंता भाऊसाहेब कुंजीर, अधीक्षक अभियंता व प्रशासक मनोहर पोकळी,   साहाय्यक  मुख्य अभियंता के. डी. सोनवणे आदींनी केले आहे.
स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या इच्छुकांनी जयश्री वाघ यांच्याशी २५७८४६४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.