पुत्रांना विधानसभा उमेदवारी मिळण्यासाठी धडपड
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपसह अन्य राजकीय पक्षांचे ज्येष्ठ नेते विदर्भात तरुण नेतृत्वाला राजकारणाची सूत्रे देण्यासाठी सक्रिय झाले असून त्यातील अनेकांनी उमेदवारीसाठी गॉडफादरच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले आहेत.
विधानसभा निवडणुकीची चहलपहल सुरू झाली असून विविध राजकीय पक्षांतील ज्येष्ठ नेत्यांनी घराणेशाही कायम राहावी यासाठी मुलाला किंवा नातेवाईकाला उमेदवारी मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहे. गेल्या दोन वर्षांत तरुण मतदारांची वाढती संख्या बघता जास्तीत जास्त तरुणांना समोर आणून विविध पक्षांमध्ये महत्त्वाची पदे दिली जात आहेत. काहींचे वारसदार आणि कट्टर समर्थक राजकारणात स्थिरावले आहेत. काहींचे वारसदार धडपडत असून त्यांना सक्रिय केले जात आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कृष्णराव पांडव यांचे चिरंजीव गिरीश पांडव, गोविंदराव वंजारी यांचे चिरंजीव अभिजित वंजारी, माजी खासदार विलास मुत्तेमवार यांचे चिरंजीव विशाल मुत्तेमवार, दत्ता मेघे चिरंजीव सागर आणि समीर मेघे, रणजित देशमुख यांचे चिरंजीव आशीष आणि अमोल देशमुख, अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख, जोगेंद्र कवाडे यांचे चिरंजीव जयदीप कवाडे, रोहयो मंत्री नितीन राऊत यांचे चिरंजीव कुणाल राऊत, बाबा शेळके यांचे चिरंजीव बंटी शेळके आदी राजकारणात सक्रिय झाले आहेत. जिल्ह्य़ात आणि शहरातील विविध मतदारसंघात उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर दत्ता मेघे आणि त्यांचे पुत्र सागर आणि समीर मेघे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
मंत्रिपद भूषविणाऱ्या अनिल देशमुखांनी आता सलीलला राष्ट्रवादीची नागपूर जिल्ह्य़ातील जबाबदारी देण्याच्या दृष्टीने पायाभरणी केली आहे. सलील सक्रिय असल्याने राजकीय उठाठेवीत त्यांचा अनेक ठिकाणी सहभाग दिसून येत असल्यामुळे त्याचे उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणजित देशमुख यांचे पुत्र आशिष देशमुख पुन्हा सक्रिय झाले आहेत. स्वतंत्र विदर्भाच्या मुद्दय़ावरून त्यांनी केलेल्या आंदोलनामुळे ते विदर्भात चांगलेच ‘हायलाईट’झाले. त्यांनी तरुणांना आकर्षित केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने त्यांनी तयारी सुरू केली. मधल्या काळात भाजपपासून ते दूर गेले होते. देशमुख पुन्हा उपोषणानंतर पक्षात सक्रिय झाले आहेत. त्याचाच लहान भाऊ अमोल देशमुख काँग्रेसकडून रामटेकमधून निवडणूक लढण्यास इच्छुक असून त्यांनी त्या भागात मेळावे, बैठका आणि नागरिकांच्या भेटी घेणे सुरू केले आहे. रोहयो मंत्री नितीन राऊत यांचा मुलगा कुणाल राऊत युवक काँग्रेसच्या माध्यमातून सक्रिय झाला आहे.
वर्धेतील दिग्गज नेत्या दिवं. प्रभा राव यांची कन्या चारुलता राव-टोकस यांचे थेट दिल्लीपर्यंत कनेक्शन असल्यामुळे वध्र्यातून काँग्रेसतर्फे विधानसभा निवडणूक लढण्यासाठी टोकस यांनी तयारी सुरू केली आहे. विधानसभेचे माजी उपाध्यक्ष प्रमोद शेंडे यांचे पुत्र शेखरसाठी प्रयत्न सुरू आहेत. बुलढाण्यात आनंदराव अडसूळ यांनी कॅप्टन अभिजितला राजकारणाचा मोकळा करून दिला असून त्यांनी विधाससभेसाठी पुन्हा मतदारसंघावर लक्ष्य केंद्रित केले आहे. पुंडलिकराव गवळींनी त्यांची कन्या भावना गवळीला थेट दिल्लीत धाडले तर अमरावतीत माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचेही चिरंजीव यावेळी पुन्हा निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. सतीश चतुर्वेदी यांचे पुत्र दुष्यंत चतुर्वेदी वडिलांसोबत सक्रिय झाले असले तरी उमेदवारीच्या स्पर्धेत येण्यासाठी त्यांना काही वर्षे वाट पाहावी लागणार आहे.
शिवाय दिवं. भाऊसाहेब मुळक यांचे पुत्र राजेंद्र मुळक यांनीही स्वत:ची ‘अभ्यासू’ अशी प्रतिमा तयार करण्यात यश मिळवले. राज्यमंत्री झाल्यानंतर तरुण वयात मोठी खाती हाताळण्याच्या चालून आलेल्या संधीचा त्यांनी योग्य उपयोग केला आहे. राज्यमंत्री म्हणून काम करताना त्यांनी ग्रामीण आणि शहर काँग्रेसमध्ये वेगळा ठसा निर्माण केला आहे. यावेळी पश्चिम नागपूरमधून निवडणूक लढण्यास इच्छुक असून त्यांनी तयारी सुरू केली आहे. दिवं. गंगाधराव फडणवीस यांचे पुत्र देवेंद्र फडणवीस यांनी अगदी नगरसेवकापासून सुरुवात करून थेट महापौरानंतर आमदारकी आणि पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदापर्यंत मजल मारली. त्यांच्या झपाटय़ाने झालेल्या प्रगतीत त्यांचे प्रभावी वक्तृत्व आणि विदर्भातील समस्यांचा गाढा अभ्यास याचा सर्वाधिक वाटा आहे. प्रत्येक मुद्दय़ावर त्यांच्याकडे तपशीलवार माहिती आणि आकडेवारी तयार असते. प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांच्यावर राज्याची जबाबदारी असली तरी दक्षिण-पश्चिममधून ते निवडणूक लढतील.

congress in gujarat loksabha
गुजरातमधील काँग्रेसचे ‘जायंट-किलर’ रूपालांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात; भाजपाचं गणित बिघडणार?
Manifesto of Samajwadi Party released
हमीभावासाठी कायदा करण्याचे आश्वासन; समाजवादी पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित
Wrong campaign, gangster type people
कल्याण पूर्वेत गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून खासदार शिंदेंचा अपप्रचार, भाजपच्या वरिष्ठांनी दखल घेण्याची जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे यांची मागणी
Vijay Wadettiwar
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी निवडणुकीपूर्वीच केली ‘चांगल्या खात्या’ची मागणी, जाणून घ्या कारण ?