टोइंग व्हॅन जाळून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी भाजपा आमदार प्रकाश मेहता यांच्यासह १६ जणांना अटक केली. गेल्या वर्षी ४ नोव्हेंबर रोजी घाटकोपर येथे पोलिसांच्या टोइंग व्हॅनची धडक लागल्याने कीर्ती मेहता यांचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर आंदोलनात पोलिसांची टोइंग व्हॅन जाळण्यात आली होती. त्या प्रकरणी मेहता  यांच्यासह काँग्रेस नगरसेवक प्रवीण छेडा व भाजपाचे माजी नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनाही अटक करण्यात आली होती.  न्यायालयात नंतर या सर्वांची जामिनावर मुक्तता करण्यात आली.