नोव्हेंबर महिन्याचे दहा दिवस उलटूनही मनमाड शहर व परिसरात थंडी अजून सुरू झालेली नाही. याउलट तापमान वाढत असल्याने ऐन हिवाळ्यात नागरिक घामाघूम झाले त्यामुळे थंडी सुरू झाल्याने काढलेले गरम कपडे पुन्हा कपाटात ठेवण्याची वेळ आली आहे.
तापमान वाढल्याने सकाळपासूनच चांगलेच घामटे निघाले अजून थंडीला सुरुवात झालेली नाही. थंडी पडण्यासाठी आणखी महिनाभर वाट बघायला लागणार असल्याची माहिती वेधशाळेत शहरात किमान तापमानाचा पारा असा चढता-उतरताच राहणार आहे. मात्र आणखी महिनाभर तापमापकाचा पारा राहील किंवा त्यापेक्षा जास्त असेल असा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे.
आकाश ढगाळलेलेच आहे. ढगाळ वातावरणामुळे परिसरातील तापमान स्थित आहे. शहरात उकाडय़ाचा प्रभाव जाणवत आहे. देशातही थंड वाऱ्याचा प्रभाव अजून दिसत नसून कमी दाबाच्या पट्टय़ामुळे थंडीचे आगमन लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. यामुळे शहर परिसरात रस्त्यावर थंडीच्या कपडय़ांचे थाटलेले दुकान अद्याप ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहे.