कवी-लेखिका सुनीता झाडे यांच्या ‘रसिया’ या काव्यात्मक शैलीतील ललितबंध ग्रंथाचा प्रकाशन सोहळा महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रोड, पुणे येथील माधवराव पटवर्धन सभागृहात शनिवारी, ३० मे रोजी सायंकाळी ६ वाजता दिलीपराज प्रकाशनतर्फे आयोजित करण्यात आला आहे.
ग्रंथाचे प्रकाशन ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या अध्यक्षतेखाली, ज्येष्ठ समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होईल. ललितबंधावर कवी संतोष शेणई आणि ज्येष्ठ समीक्षक डॉ. अश्विनी धोंगडे आपले विचार मांडतील. यावेळी नाटय़ दिग्दर्शक रवींद्र लाखे आणि डॉ. प्रिया जामकर हे रसियातील निवडक भागाचे वाचन करणार आहेत. सुनीता झाडे यांची यापूर्वी ‘कॉमनवूमन’, ‘आत्मनग्न’ ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन प्रकाशक दिलीपराज प्रकाशनचे राजीव बर्वे यांनी केले आहे.