मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- टोलप्रकरणी हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी
- सोलापूर विद्यापीठाच्या नामांतरावरून राजकारण रंगू लागले
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
वाशीच्या एपीएमसी बाजारात भाज्यांचा महापूर आल्याने भाज्या कमालीच्या स्वस्त झाल्या आहेत. मात्र ही स्वस्ताई किरकोळ व्यापारी मधल्यामध्ये खिशात घालून ग्राहकाला मात्र त्याचा लाभ देत नाहीत. वाशी ते मुंबई वाहतूक खर्च आणि वाजवी नफा गृहित धरूनही मुंबई, ठाणे व नवी मुंबईतील किरकोळ बाजारांमधील तसेच पदपथावर भाजी विक्री करणारे विक्रेते ग्राहकांची किती लूट करीत आहेत हे लक्षात येऊ शकेल. दुर्दैव म्हणजे ग्राहकाच्या खिशातून जाणारे हे पैसे शेतकऱ्यापर्यंतसुद्धा पोहोचत नाहीत. किरकोळ आणि घाऊक व्यापारी व अडते यांच्याच खिशात ही 'माया' जाते. एपीएमसीवर कारवाईचा बडगा उगारण्याचा पवित्रा घेणारे सरकार किरकोळ व्यापाऱ्यांवर कारवाई कधी करणार, हा आता प्रश्न आहे. खालील तक्त्यामधील दर उत्तम दर्जाच्या मालाचे आहेत. एपीएमसी बाजारात 'नंबर-१' मानकानुसार विकल्या जाणाऱ्या मालाचे हे दर आहेत. किरकोळीची तुलना करताना सरासरी दर देण्यात आले आहेत. अतिशय सुमार दर्जाच्या भाजीचे दर आणखी कमी असू शकतात.
भाजीचे नाव घाऊक दर प्रतिकिलो किरकोळ दर प्रतिकिलो
कांदा : १३.५० रुपये २२ ते २४
बटाटा : १२ रुपये २२
भेंडी : ३० रुपये ५० ते ६०
फ्लावर : ३ ते ५ २० ते ४०
कोबी : ३ ते ४ २० ते ४०
टॉमेटो : ८ ते १० ३० ते ६०
काकडी : १८ ३० ते ४०
गाजर : १५ ३५ ते ४०
दुधी : ४ ते ६ २० ते २५
फरसबी : २० ते २६
पडवळ : १० ते १२
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















