दिवाळीच्या पूर्वसंध्येला मराठी चित्रपट सृष्टीतील सदाबहार दाम्पत्य रमेश आणि सीमा देव यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधी ठाणेकर रसिकांना उपलब्ध झाली. त्यांच्यासोबत किशोर प्रधान-शोभा प्रधान, रवी पटवर्धन, अण्णा व्यवहारे, डॉ. सुबोध मेहता, डॉ. स्नेहल तन्ना, डॉ. विष्णू जोशी, माधुरी ताम्हणे यांनीही या संवाद मैफलीत भाग घेतला.
वाविकर आय इन्स्टिटय़ूटच्या वतीने गडकरी रंगायतनमध्ये आयोजित या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी ‘नॉट रिटायर्ड-नॉट टायर्ड’ हा संदेश दिला. अभिनेत्री समीरा गुजर-जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या वेळी ८९ वर्षीय रमेश देव यांनी आपल्या उत्साही व्यक्तिमत्त्वाने मैफलीत रंग भरले.