tv03डोंबिवली शहर परिसरातील नागरिकांना विविध जातीची फूलपाखरे एकाच उद्यानात पाहता यावीत या उद्देशाने रोटरी क्लब डोंबिवली पूर्व विभागाने ‘एमआयडीसी’तील रोटरी भवनच्या आवारात फुलपाखरांचे उद्यान विकसित केले आहे. चिमुरडी मुले, पक्ष्यांसाठी खुले असलेले हे उद्यान फूलपाखरांच्या निवारा व भटकंतीसाठी मोकळे करून देण्यात आले आहे.  
आंतरराष्ट्रीय रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष कल्याण बॅनर्जी यांच्या उपस्थितीत या उद्यानाचे ४ जानेवारी रोजी संध्याकाळी पाच वाजता उद्घाटन होणार आहे. राज्यासह देशाच्या काही भागांत फूलपाखरांची सुमारे २० ते २२ उद्याने आहेत. मुंबईत ‘बॉम्बे नॅचरल हिस्र्ट्ी सोसायटी’, धारावीत ‘महाराष्ट्र नेचर क्लब’   आणि ठाण्यात घोडबंदर रस्त्याजवळ राजेंद्र ओवळेकर यांनी विकसित केलेल्या फूलपाखरांच्या वास्तव्य असलेल्या बागा आहेत. डोंबिवली, कल्याण परिसरातील नागरिकांना अशाच प्रकारे वेगवेगळ्या प्रजातींची फूलपाखरे एकाच जागी पाहता यावीत, यासाठी हे उद्यान विकसित करण्यात आले आहे. शालेय मुलांनी केवळ पुस्तकातून फूलपाखरांचा अभ्यास करण्याऐवजी प्रत्यक्ष बागेत येऊन फूलपाखरे पाहता यावीत म्हणून डोंबिवलीत हा प्रकल्प राबवला आहे, असे रोटरी मंडळाचे माजी गव्हर्नर डॉ. उल्हास कोल्हटकर यांनी सांगितले. फूलपाखरांचे कायमस्वरूपी वास्तव्य या भागात राहावे. त्यांचे प्रजनन, पोषण tv05योग्य रीतीने व्हावे यासाठी रुई, अशोका, बाभुळ, कडिपत्ता, लॅन्टेना, जमैकत अशी विविध प्रकारची पन्नास नवीन रोपटी रोटरी उद्यानात लावण्यात आली आहेत. ‘नागरिकांना चोहोबाजूने फूलपाखरे पाहता यावीत. यासाठी वाफे पद्धतीने उद्यानात झाडे लावण्यात आली आहेत. फूलपाखरांना उद्यानातच त्यांचे खाद्य मिळावे म्हणून झाडांना जाळ्या टांगून त्यामध्ये परिपक्व झालेली अननस, सफरचंद, पपईसारखी फळे ठेवण्यात येत आहेत. फूलपाखरांना प्रजनन, पोषणासाठी आवश्यक असलेल्या झाडांचे नियोजन करण्यात आले आहे. उद्यानालगतच्या साठ फूट लांब भिंतीवर विविधरंगी फूलपाखरे काढण्यात आली आहेत. चित्रकार प्रभाकर महागांवकर यांनी उद्यानाची आकर्षक सजावट केली आहे.
काय बघाल?
tv04फूलपाखरू उद्यानात हरी गणेश पाटील, परशुराम शुक्ल, वर्ड्सवर्थ या कवींच्या फूलपाखरांवरील कविता लावण्यात आल्या आहेत. फूलपाखरांचा इतिहास, त्यांच्या जन्मापासून ते शेवटपर्यंतच्या प्रवासाची माहिती देण्यात आली आहे. उद्यानात फूलपाखरांना मुक्त विहार करता यावा अशी व्यवस्था आहे. अतिप्रकाश, उष्णता फूलपाखरांना सहन होत नाही. म्हणून या उद्यानातून वीजेची व्यवस्था काढून टाकण्यात आली आहे. झाडांसाठी सेंद्रीय खत, मातीचा वापर करण्यात आला आहे.
अभ्यासकांना उपयुक्त
अनेक अभ्यासक फूलपाखरू हा विषय घेऊन पीएच.डीचा अभ्यास करतात. त्यांना हे उद्यान फायदेशीर आहे. फूलपाखरू विषयाच्या अभ्यासकांना विदेशात शिष्यवृत्ती दिल्या जातात. त्या अभ्यासकांना या माध्यमातून प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. जगात एकूण विविध प्रकारची १८ हजार फूलपाखरे आहेत. त्यामधील विविध प्रकारची १ हजार ५०२ फूलपाखरे भारतात आहेत.

three thousand families staying near waldhuni river boycotting lok sabha election, construction within river bed
कल्याणमध्ये वालधुनी नदी परिसरातील तीन हजार कुटुंबीयांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार
concrete road works Kalyan, Kalyan - Dombivli,
कल्याण – डोंबिवलीतील काँक्रीट रस्त्यांची कामे पावसापूर्वी पूर्ण करा, आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांचे आदेश
The Central Wildlife Board proposed a highway through the largest tiger project in the country
देशातील सर्वात मोठय़ा व्याघ्रप्रकल्पातून महामार्ग जाणार
Dombivli east, Assistant Commissioner, Notice, Illegal Shop Construction, block road, old jakat naka, gandhi nagar road, kalyan dombivali municipal corporation,
डोंबिवलीत रस्ते अडवून बेकायदा गाळ्यांची उभारणी, ग प्रभागाच्या साहाय्यक आयुक्तांकडून नोटीस