देवळाली छावणी मंडळाच्या उपाध्यक्षपदाची माळ अखेर सचिन ठाकरे यांच्या गळ्यात पडली. भाजपमध्ये या पदासाठी प्रचंड चुरस होती. निवडणुकीआधी भाजपमध्ये दाखल झालेल्या माजी आमदार वसंत गिते यांचे कट्टर समर्थक असणाऱ्या ठाकरे यांचे नाव निश्चित झाले. गिते यांनी भाजपमध्ये आपली चुणूक दाखविण्यास या निमित्ताने सुरुवात केली आहे.
देवळाली छावणी मंडळाची जानेवारी महिन्यात निवडणूक झाली होती. मंडळाच्या आठपैकी सहा जागांवर विजय संपादित करून भाजपने एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले. उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी शुक्रवारी ब्रिगेडिअर संजीव तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली मंडळाच्या सभागृहात बैठक पार पडली. या पदासाठी भाजपचे जुने कार्यकर्ते भगवान कटारिया, राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले बाबूराव मोजाड आणि मनसेतून भाजपमध्ये दाखल झालेल्या सचिन ठाकरे यांच्यात चढाओढ सुरू होती. या तिन्ही इच्छुकांशी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी चर्चा केली. तीन इच्छुकांना आपले नाव निश्चित होईल असे वाटत असताना सकाळी ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. भाजपचे बहुमत असल्याने निवडणूक प्रक्रिया अविरोध पार पडली. ठाकरे यांचे नाव जाहीर झाल्यावर समर्थकांनी एकच जल्लोष केला. मनसेचे माजी आमदार वसंत गिते यांच्यासमवेत काही महिन्यांपूर्वी ठाकरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. या निवडीच्या निमित्ताने गिते यांनी पक्षात आपले स्थान बळकट करण्यास सुरुवात केल्याची चर्चा सुरू आहे.

Chief Minister Eknath Shinde
“मला रोज फोन यायचे, साहेब त्यांना काहीतरी सांगा”; शिवतारेंच्या निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितला किस्सा
Shobha Bachhav, BJP Dhule,
धुळ्यात भाजप, काँग्रेसमध्ये चुरशीची लढत ? शोभा बच्छाव यांच्या उमेदवारीनंतर जिल्हाध्यक्षांचा राजीनामा
BJP needs support from MNS A look at Raj Thackeray stance on participation in the Grand Alliance
भाजपला मनसेची साथ हवी ; महायुतीतील सहभागाबद्दल राज यांच्या भूमिकेकडे लक्ष
Jalgaon district president of Ajit Pawar group sanjay pawar criticizes Eknath Khadses surrender to avoid imprisonment
एकनाथ खडसेंची शरणागती तुरुंगवारी टाळण्यासाठीच, अजित पवार गटाच्या जळगाव जिल्हाध्यक्षांची टीका