सर्वाना शोध असतो उत्तम आरोग्याच्या गुरूकिल्लीचा. आजच्या धावत्या जगात जीवनशैलीशी निगडित अनेक आरोग्यविषयक समस्यांनी मानवाला पछाडले आहे. या समस्यांचा ऊहापोह करण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी ‘लोकसत्ता’च्या वतीने ‘आरोग्यमान भव’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आरोग्य संदर्भातील प्रश्न, जीवनशैली, आहार, मानसिक आरोग्य या संदर्भात खास परिसंवाद आणि आरोग्य प्रदर्शन तसेच आयोजित करण्यात आलेल्या  कार्यक्रमात तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

प्रवेशिका कोठे मिळणार?
या कार्यक्रमासाठी ३० रुपये प्रवेश शुल्क असून प्रवेशिका १६ सप्टेंबरपासून लोकसत्ता, कुसुमांजली, दुसरा मजला, गोखले रोड, कॉसमॉस बँकेच्या वर, नौपाडा, ठाणे (पश्चिम) येथे आणि टिप टॉप प्लाझा, एल. बी. एस. मार्ग, ठाणे (पश्चिम) येथे सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत उपलब्ध असतील.

आरोग्यमान भव!
(आरोग्य विषयांवर परिसंवाद व प्रदर्शन)
*  २० आणि २१ सप्टेंबर, सकाळी १० वा.
*  टिप टॉप प्लाझा, एल. बी. एस. मार्ग, ठाणे (प.)