विजयादशमीच्या दिवशी सोने म्हणून वाटल्या जाणाऱ्या आपटय़ांच्या पानांमुळे वास्तवात निसर्गातला अक्षरश: सोन्यासारखा असणारा हा वृक्ष त्याच्या बहरापासून वंचित राहू लागला आहे. आपटा अथवा शमी नावाने ओळखल्या जाणाऱ्या गुलमोहर प्रजातीतील या वृक्षाचे शास्त्रीय नाव ‘बहुहिनिया रसिमोझा’. गुलमोहरप्रमाणेच हा वृक्ष मार्च-एप्रिलमध्ये बहरतो. ऑक्टोबर महिन्यात येणाऱ्या दसऱ्यानिमित्त या वृक्षाची पाने सोने म्हणून वाटण्याची परंपरा आहे. विजनवासात जाण्याआधी पांडवांनी आपली शस्त्रे या वृक्षावर ठेवल्याचा संदर्भ महाभारतातील कथेत आहे. विपुल जंगलसंपदा आणि मर्यादित लोकसंख्या असणाऱ्या काळात या अत्यंत उपयुक्त वृक्षाचे महत्त्व जनमानसावर बिंबबिण्यासाठी ही प्रथा पडली असण्याची शक्यता आहे. मात्र आता वाढत्या काँक्रीटच्या जंगलात हिरवाई दुर्मीळ होत असताना केवळ परंपरा म्हणून अक्षरश: ओरबाडून आणलेली आपटय़ाची पाने सोने म्हणून वाटणे कितपत संयुक्तिक आहे, असा प्रश्न रुईया महाविद्यालयातील जीवशास्त्राच्या प्रा. मनीषा कर्पे यांनी उपस्थित केला आहे.
ठाणे जिल्ह्य़ातील अतिशय झपाटय़ाने होत असलेल्या नागरीकरणाच्या रेटय़ातही टिकून राहिलेली जैवविविधता हा प्रा. कर्पे यांचा अभ्यासाचा विषय आहे. अंबरनाथ-बदलापूर परिसरात अजूनही आढळून येणाऱ्या शेकडो वृक्ष तसेच प्राणिमात्रांची सचित्र नोंद घेणे हा त्यांचा छंद आहे. शमी अथवा आपटय़ाचे झाड त्या नोंदींपैकीच एक. हृदयाच्या आकाराची आपटय़ाची पाने जशी सुबक दिसतात, तशीच त्याला पांढऱ्या, गुलाबी आणि जांभळ्या रंगाची मनमोहक फुलेही येतात. गुलमोहराप्रमाणेच फेब्रुवारी-मार्चमध्ये बहर येणारा हा वृक्ष पाहणे अतिशय नेत्रसुखद असते. मात्र दसऱ्याच्या दिवशी या वृक्षाची पाने एकमेकांना सोने म्हणून देण्याच्या प्रथेमुळे ऑक्टोबर महिन्यातच या झाडावर अतिशय निर्दयपणे कुऱ्हाड चालवली जाते. त्यामुळे बोडके झालेले हे झाड बहर काळातही खुरटलेलेच राहते, असे निरीक्षण प्रा. मनीषा कर्पे यांनी नोंदविले आहे.
शोभिवंत आणि गुणवंत
गुलमोहराच्या प्रजातीतील असला तरी शमी वृक्ष त्याच्यासारखा निरुपयोगी नाही. पूर्ण बहरात असताना अतिशय शोभिवंत दिसणाऱ्या या वृक्षाच्या सालीपासून तसेच पानांपासून काढलेला रस त्वचारोग तसेच अस्थमाचा त्रास असणाऱ्यांसाठी गुणकारी आहे. आदिवासी लोक तेंदुपत्त्याप्रमाणे या वृक्षाची पाने विडय़ा वळण्यासाठी वापरतात. या झाडाच्या कोवळ्या पानांची भाजीही करतात. हल्ली या वृक्षाच्या काही संकरित जातींची उद्यानात लागवड केली जाते.     

Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
Olya Sodyachya Vadya Recipe In Marathi
ओल्या सोड्याचे कटलेट; संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सोपी रेसिपी, मुलंही आवडीनं खातील
Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?
Sensex Nifty gains higher as a result of mineral oil prices
तेलाच्या भडक्याने ‘सेन्सेक्स-निफ्टी’च्या दौडीला पाचर