केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे येत्या रविवारी, १७ फेब्रुवारी रोजी सोलापुरात येत आहेत. या वेळी ते जिल्हय़ातील दुष्काळ प्रश्नावर आढावा बैठक घेतील अशी अपेक्षा आहे. सोलापूरच्या राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या अतिरिक्त संचालकांबरोबर पवार हे डाळिंब प्रश्नावर चर्चा करणार आहेत.
मुंबईहून सिद्धेश्वर एक्स्प्रेसने पवार यांचे सकाळी आगमन झाल्यानंतर शासकीय विश्रामगृहात तासभर थांबणार आहेत. या वेळी त्यांच्याकडून जिल्हय़ातील दुष्काळ प्रश्नावर आढावा घेतला जाण्याची अपेक्षा असून त्याचवेळी पुणे रस्त्यावरील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या अतिरिक्त संचालकांबरोबर डाळिंब प्रश्नावर चर्चा करणार आहेत. नंतर हेलिकॉप्टरने ते उस्मानाबादकडे प्रयाण करणार आहेत.