शिवरायांचे मराठी स्वराज्य आकारण्यास अनेक हिऱ्याचिऱ्यांचे योगदान लाभले. अनेक संकटात राजांना त्यांच्या मावळ्यांनी प्राणार्पण देऊन सहिसलामत बाहेर काढले. अफजलखानाच्या भयंकर आक्रमणातून शिवरायांचे प्राण वाचवून जीवाजी महालाने आपले नाव इतिहासात अमर केले, असे विचार विदर्भ साहित्य संघ गोंडवन शाखेचे अध्यक्ष डॉ.शरदचंद्र सालफळे यांनी हरीश ससनकर लिखित ‘शिवरक्षक जीवाजी महाला’ या   पुस्तकाच्या   प्रकाशन  प्रसंगी व्यक्त केले. स्थानिक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयात हा सोहळा झाला.
येथील इतिहास अभ्यासक अशोकसिंह ठाकूर यांचे हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी रवींद्र जगदाळे, पुणे, शिवचरित्र अभ्यासक दत्ताजी नलावडे, पुणे, राज्य ग्रंथालय संघ, मुंबईचे अध्यक्ष अनिल बोरगमवार, चित्रकार सुदर्शन बारापात्रे यांचीही यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती. आजवर फक्त ‘होता जीवा म्हणून वाचला शिवा’ या एका म्हणीत कैद असलेल्या जीवा महालाला हरीश ससनकरांनी या पुस्तकरूपाने पुन्हा जिवंत केले. स्वतंत्र चरित्ररूपाने प्रसिध्द होणारे हे त्यांचे पहिलेच चरित्र असावे, असे विचार त्यांनी मनोगतात व्यक्त केले. शिवरायांच्या निवडक दहा मावळ्यांमधून अंगरक्षकासाठी एकटय़ा जीवाची निवड केली म्हणजे त्याच्यात एक मोठा पराक्रमी पुरुष नक्कीच दडला असेल, या उत्सुकतेपोटी या विषयाकडे वळल्याचे हरीश ससनकर यांनी म्हणाले. यावेळी पुस्तकासाठी मुखपृठ, मलपृष्ठ व आतील प्रसंगानुरूप चित्रे साकारणारे सुदर्शन बारापात्रे, अनिल बोरगमवार, दत्ताजी नलावडे यांनीही आपले विचार व्यक्त केले. पुस्तकाच्या निर्मितीत महत्वाचे योगदान देणारे ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर व सेवानिवृत्त प्राचार्य डॉ.अनिल काटकर यांचा यावेळी आयोजकांतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी पुणे येथील शिवकालीन शस्त्रांचे तज्ज्ञ वस्ताद रवींद्र जगदाळे यांनी विविध दुर्मिळ शस्त्रांचे प्रदर्शन लावले व दांडपट्टा, लाठीकाठी, तलवार, चक्री व अन्य शस्त्रांचे प्रात्याक्षिक करून शिवकालीन प्रसंग उभे केले व उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे संचालन अर्चना काशीकर यांनी, हरीश ससनकर यांनी, तर आभार वैशाली सुर्यवंशी-ससनकर यांनी मानले.
प्रदर्शन व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अरविंद फुलभोगे, निखिल तांबोळी, शुभांगी तांबोळी, गजानन चिंचोलकर, गणेश गौरकार, दयाल पाटील, खेमराज   मांडवगडे  यांचे सहकार्य लाभले.

Ulta-Chashma
उलटा चष्मा: लोक‘शाही’ लग्न 
Raj Thackerey teaser
VIDEO : राज ठाकरे- अमित शाह यांच्या बैठकीत काय ठरलं? शिवतीर्थवरून मिळणार उत्तर, पाहा पाडवा मेळाव्याचा टीझर!
Sanyogeetaraje Chhatrapati
कोल्हापूर जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाहू महाराज सक्षम उमदेवार – युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती
beed district loksabha marathinews, dhananjay munde marathi news
मराठा समाजाचा रोष कमी करण्यासाठी धनंजय मुंडे यांचा बैठकांवर जोर, मराठा भवन बांधून देण्याचे आश्वासन