कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणाऱ्या श्री. ना. पेंडसे कादंबरी पुरस्कारासाठी रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांची निवड करण्यात आली आहे.  राज्यस्तरावर ‘कोमसाप’तर्फे घेण्यात आलेल्या कादंबरी स्पर्धेत ३७ स्पर्धक सहभागी झाले होते. ‘खेळघर’ या कादंबरीसाठी हा पुरस्कार जाहीर झाला असून १५ हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
रवी लाखे, डॉ. ज्योतिका ओझरकर, डॉ. चंद्रकांत भोंजाळ यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. परीक्षक समितीच्या प्रमुखपदी ज्येष्ठ साहित्यिक व ‘कोमसाप’चे विश्वस्त मधु मंगेश कर्णिक होते. ‘कोमसाप’च्या ग्रंथ प्रकाशन समितीचे प्रमुख सतीश सोळांकूरकर यांनी संयोजक म्हणून काम पाहिले.
येत्या ७ ते ९ जानेवारी या कालावधीत दापोली येथे होणाऱ्या १४ व्या ‘कोमसाप’ साहित्य संमेलनात हा पुरस्कार मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.