ाअडीच हजार ऋचांचा मराठीत अनुवादो साध्या सोप्या शब्दांचा वापरो अभ्यासक, वेदपाठ शाळांना माहितीपूर्ण ग्रंथो चैत्र पाडव्यापर्यंत प्रकाशित ो ऋग्वेदानंतर शुक्ल यजुर्वेदही मराठीत
भगवान मंडलिक
गेल्या पाच वर्षांपूर्वी ऋग्वेदाचा संपूर्ण मराठी अनुवाद करून विज्ञाननिष्ठ ऋग्वेद समाजासमोर आणणारे ९० वर्षीय डोंबिवलीतील डॉ. भीमराव सदाशिव कुलकर्णी यांनी ‘शुक्ल यजुर्वेदा’चाही संपूर्ण मराठी अनुवाद करण्याचे अवघड काम पूर्ण केले आहे. अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. आपल्या वृध्दत्वावर मात करीत गेल्या दीड वर्षांपासून डॉ. कुलकर्णी शुक्ल यजुर्वेदाची संहिता वाचन, त्या मधील ऋचेचा विग्रह आणि त्याचे विश्लेषण करण्याचे काम घरबसल्या करीत होते.
वाई येथे शालेय शिक्षण पूर्ण करीत असताना डॉ. भीमराव यांचे शिक्षक गोटखिंडीकर यांनी, त्यांना ऋग्वेदामध्ये विज्ञानाचा खूप मोठा अर्थ दडला आहे. तू कधी मोठा होऊन मोकळा वेळ मिळाला तर ऋग्वेदाचा मराठी अनुवाद करून ते विज्ञान समाजासमोर आणण्याचे काम कर, अशी सूचना केली होती. गुरुजींचा हा शब्द पक्का मनात ठेवून मुंबईतील सेठ गोवर्धनदास सुंदरदास मेडिकल कॉलेज आणि केईएम रुग्णालयातून प्राध्यापक म्हणून निवृत्त झाल्यानंतर डॉ. कुलकर्णी यांनी आठ वर्षांच्या अथक प्रयत्नाने ऋग्वेदाचा संपूर्ण मराठी अनुवाद करून तो ग्रंथही पाच खंडांमध्ये प्रकाशित केला.
अद्याप आपली दृष्टी साफ आहे, हाताने लिखाण होत आहे. त्यामुळे नुसता बसून वेळ घालविण्यापेक्षा डॉ. भीमराव यांनी पूर्णपणे बिछान्याला खिळून असलेल्या पत्नीची शुश्रूषा करीत, गेल्या दीड वर्षांपासून शुक्ल यजुर्वेदाचा मराठीत अनुवाद करण्याचे, त्यामधील संहिता, ऋचेचे अर्थ उलगडून हस्तलिखिते तयार केली.
याविषयी बोलताना डॉ. भीमराव कुलकर्णी यांनी सांगितले, शुक्ल यजुर्वेदाची नवी दिल्लीतील वज्रजीवन प्राच्यभारती ग्रंथमास येथून आपण मूळ प्रत मिळविली. त्यामधील संहितेचा आपण अनुवादासाठी उपयोग केला आहे. त्यामध्ये एकूण सुमारे अडीच हजार ऋचा आहेत. शुक्ल यजुर्वेदात अर्धा भाग देवस्तुती, यज्ञिय तंत्र, होमहवन व उरलेल्या अध्र्या भागात भौगोलिक परिस्थिती व त्याची माहिती देण्यात आली आहे. याज्ञवल्क्य ऋषींनी सूर्यापासून वेद मिळवून यजुर्वेदाची निर्मिती केली अशी दंतकथा आहे. शुक्ल यजुर्वेदामधील प्रत्येक ऋचेचा विग्रह, अन्वय आपण स्वत: करतो. मूळ अर्थावर स्वत:चे भाष्य करतो. संस्कृत, विज्ञानाचा अभ्यासक असल्याने आणि ऋग्वेदाचाही यापूर्वी अनुवाद केला असल्याने हे काम करणे सोपे झाले आहे. वेदाच्या अभ्यासकांसह, सातार, कराड, नाशिक येथे शुक्ल यजुर्वेदाच्या पाठशाळा आहेत. तेथे या अनुवादित ग्रंथाचा नक्कीच उपयोग होईल, असे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.
हिंदुस्थानचा धर्म आणि संस्कृती, वेद प्रचाराचे मोठे काम डॉ. कुलकर्णी करीत असल्याने शासकीय सेवेतील निवृत्त उपसचिव मनोहर गोखले व त्यांचे सहकारी मिलिंद मोहनदास (प्रिंटर) यांनी शुक्ल यजुर्वेदाचे प्रकाशन आणि वितरण करण्याचे आव्हान उचलले आहे. हा अनुवादित ग्रंथ ‘ई-प्रकाशित’ करण्याचा गोखले यांचा मानस आहे. चार वेद म्हणजे चार ऋषी असे आकर्षक मुखपृष्ठ या दोन खंडात प्रसिद्ध होणाऱ्या ग्रंथांना आहे. येत्या चैत्र पाडव्यापर्यंत हा ग्रंथ प्रकाशित होण्याची शक्यता आहे. प्रकाशनपूर्व सवलत ठेवण्यात आली आहे.
संपर्क- मनोहर गोखले- ९८७०५८६६५७.

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
balmaifal story for kids why we celebrate gudi padwa as a new marathi year
बालमैफल: नवचैतन्याचा पाडवा
lokrang, article, pandit kumar gandharv, singing style, thoughts, indian classical music, book, about to launch, gandharvanche dene pandit kumarjinshi sanvad,
कुमारजींचा सांगीतिक विचार