नवरात्रोत्सव, विजयादशमी व दिवाळी निमित्ताने प्रवाशांची गर्दी लक्षात घेता रेल्वेने नागपूरमार्गे पुणे- कामाख्या व जयपूर- मदुराई दरम्यान विशेष गाडय़ा सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे-कामाख्या ०२५११ साप्ताहिक प्रिमिअम अतिजलद विशेष गाडी २२ सप्टेंबर ते १३ नोव्हेंबर दरम्यान प्रत्येक गुरुवारी १०.३० वाजता निघेल. दुसऱ्या दिवशी २६ सप्टेंबर ते १३ नोव्हेंबर दरम्यान प्रत्येक शुक्रवारी ती नागपूरला ०१.२० वाजता येऊन ०१.३० वाजता निघेल. तिसऱ्या दिवशी कामाख्याला १५.१५ वाजता पोहोचेल. ०२५१२ कामाख्या- पुणे साप्ताहिक प्रिमिअम अतिजलद विशेष गाडी २२ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान प्रत्येक सोमवारी २२.४५ वाजता निघेल. दुसऱ्या दिवशी २४ सप्टेंबर ते १२ नोव्हेंबर दरम्यान प्रत्येक बुधवारी ती नागपूरला ११.१५ वाजता येऊन ११.२५ वाजता निघेल. तिसऱ्या दिवशी ०२.४५ वाजता ती पुण्याला पोहोचेल. न्यू जलपाई गुडी, आसनसोल, राऊरकेला, रायपूर, नागपूर, पनवेल येथे या गाडय़ा थांबतील. एक द्वितीय वातानुकूलित, दोन तृतीय वातानुकूलित, आठ शयनयान, एक पँट्री कार, दोन, एसएलआर, असे एकूण चौदा डबे या गाडय़ांना राहतील.
जयपूर- मदुराई ०९७२३ प्रिमिअम अतिजलद विशेष गाडी २० सप्टेंबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान प्रत्येक शनिवारी १३.१५ वाजता निघेल. दुसऱ्या दिवशी २१ सप्टेंबर ते १६ नोव्हेंबरदरम्यान प्रत्येक रविवारी ०८.३० वाजता ती नागपूरला येऊन ०८.४० वाजता निघेल. तिसऱ्या दिवशी ११.२५ वाजता ती मदुराईला पोहोचेल. ०९७२४ मदुराई-जयपूर प्रिमिअम अतिजलद विशेष गाडी २३ सप्टेंबर ते १८ नोव्हेंबर दरम्यान प्रत्येक मंगळवारी ०६.३० वाजता निघेल. दुसऱ्या दिवशी २४ सप्टेंबर ते १९ नोव्हेंबर दरम्यान प्रत्येक बुधवारी १०.२० वाजता नागपूरला येऊन १०.३० वाजता निघेल. तिसऱ्या दिवशी ०५. वाजता ती जयपूरला पोहोचेल. भोपाळ, नागपूर, विजयवाडा, चेन्नई व तिरुचिरापल्ली येथे या गाडय़ा थांबतील. एक प्रथम वातानुकूलित, दोन द्वितीय वातानुकूलित, तीन तृतीय वातानुकूलित, अकरा शयनयान, एक पँट्री कार, दोन एसएलआर, असे एकूण वीस डबे या गाडय़ांना राहतील.